Coronavirus: देशात झपाट्याने घटतीय कोरोना संक्रमितांची संख्या; पाठिमागील 24 तासात 20 हजारांहून कमी रुग्ण, 206 दिवसांतील सर्वात मोठा निचांक

देशवासीयांसाठी मोठी खुशखबर आहे. देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. पाठिमागील 24 तासात संपूर्ण देशात नोंदली गलेली कोरोना संक्रमितांची संख्या 19,740 इतकी आहे. संपूर्ण देशात प्रदीर्घ काळानंतर प्रथमच रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशवासीयांसाठी मोठी खुशखबर आहे. देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. पाठिमागील 24 तासात संपूर्ण देशात नोंदली गलेली कोरोना संक्रमितांची संख्या 19,740 इतकी आहे. संपूर्ण देशात प्रदीर्घ काळानंतर प्रथमच रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. पाठिमागील 206 दिवसांमधील हा सर्वात निचांकी आकडा आहे. देशातील आजवरची कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 3 कोटी 39 लाख 309 ईतकी झाली आहे. पाठिमागील 24 तासात 248 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4, 35, 375 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

देशातील एकूण सक्रिय कोरोना संक्रमितांच्या संख्या 2,36,643 इतकी आहे. जी पाठिमागील 206 दिवसांमधील सर्वात निचांकी आहे. सक्रीय कोरोना संक्रमितांचे प्रणा 1% पेक्षाही कमी आहे. दरम्यान, हा दर सरासरी 0.70% आहे. जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी नोंदला गेला आहे. (हेही वाचा, Railway Platform Ticket Price Raised: मुंबईत प्लॅटफॉर्म तिकीट दर पाचपटींनी वाढले, COVID-19 संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची शक्कल)

देशातील कोरोना संक्रमितांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.98% इतके आहे. मार्च 2020 नंतर हे प्रमाण प्रथमच सर्वात कमी आढळून आले आहे. पाठमागील 24 तासात देशभरात कोरोणा संक्रमितांपैकी 23,070 जण उपचार घेऊन बरे झाले. आता पर्यंत देशातील एकूण कोरोना संक्रमितांपैकी 3 कोटी, 32 लाख, 48 हजार, 291 लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे.

ट्विट

कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. देशातील नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनेही कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. हळूहळू सर्व निर्बंध हटवले जात आहेत. अपवाद वगळता सर्वच निर्बंध आता हटविण्यात आले आहेत. मुंबई लोकलसारखा एखादा अपवाद वगळता बाकी सर्व गोष्टी सुरळीत सुरु आहेत. महाराष्ट्रात सर्व धार्मिक स्थळे, नाट्यगृहे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आदिंना परवानगी देण्यात आली आहे. अर्थात कोरोना नियमांचे पालन करण्याचे बंधन कायम आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement