Coronavirus: बिहार भाजप मुख्यालयात कोरोना व्हायरस संसर्ग; 110 पैकी 24 जण कोविड 19 पॉझिटीव्ह

बिहार भाजपच्या पाटना येथील कार्यालयात वावर असलेल्या ज्या नेत्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्यात भाजपचे संघटन मंत्री नागेंद्र जी, प्रदेशाध्यक्ष दिनेश कुमार, उपप्रदेशाध्यक्ष राजेश वर्मा, राधा मोहन शर्मा, यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

BJP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

बिहार भाजप मुख्यालयातही (Bihar BJP Headquarters) कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पुढे आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बिहार भाजपच्या पाटना (Patna) येथील मुख्यालयात वावरणाऱ्यांपैकी 110 जणांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 24 जणांची कोरोना व्हायरस (COVID 19) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिहार भाजपच्या पाटना येथील कार्यालयात वावर असलेल्या ज्या नेत्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्यात भाजपचे संघटन मंत्री नागेंद्र जी, प्रदेशाध्यक्ष दिनेश कुमार, उपप्रदेशाध्यक्ष राजेश वर्मा, राधा मोहन शर्मा, यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना कोरोना व्हायरस संसर्ग होण्याची घटना बिहार भाजपच्या राजकारणात असे पहिल्यांदाच घडत असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, )

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूका याच वर्षी पार पडत आहेत. करोना व्हायरस संकटामुळे या निवडणुका ठरलेल्या मुदतीत पार पडतील की पुढे ढकलल्या जातील याबाबत अद्यप स्पष्टता नाही. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे. त्यामुळे सहाजिकच राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे भाजप आपल्या कार्यालयांमध्ये अभासी बैठका (व्हर्चुअल मिटिंग) करत आहे. सांगितले जात आहे की, व्हर्चुअल मिटिंगसाठी एकत्र आल्यानंतरच कुठून तरी कोरोना व्हायरस संसर्ग वाढला असावा.