Coronavirus Effect On Indian Economy: विद्यमान वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 3.2% घसरु शकतो- जागतिक बँक

1979 नंतर भारत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या घसरणीचा सामना करत असल्याचेही जागतिक बँक सांगतेल 1979 मध्ये भारताचा जीडीपी 5.24 % पेक्षाही खाली राहिला होता.

India Economic | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे वर्लड बँक (World Bank) सांगते. या काळात भारत 1979 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या आर्थिक संकटातून जाणार आहे. विद्यमान आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर (GDP) 3.2% इतका घसरल्याचे पाहायला मिळू शकते, असे जागतिक बँक (World Bank) सांगते. जागतिक बँकेने सोमवारी म्हटले की, कोरोना व्हायरस संकटामुळे जगभरात दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या स्थितीपेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवू शकते. जागतिक अर्थव्यवस्थाही अत्यंत नाजूक काळातून चालली आहे. ज्यामुळे जगभरातील करोडो लोक गरीबीची शिकार बनले आहेत.

भारताबाबत बोलायचे तर विश्व बँक सांगते 'आर्थिक प्रोत्साहन देऊन कोरोना व्हायरस संक्रमन थोपविण्यासाठी प्रयत्न करुनही अर्थव्यवस्थेतील मोठी घसरण थांबवता येणे काहीसे कठीण आहे. दुबळा झालेला जागतिक आर्थिक विकास दर आणि आर्थिक क्षेत्रावर असलेला मोठा दबाव अधिक नकारात्मक परिणाम कणारा ठरेन' (हेही वाचा, Coronavirus संकटाचा अर्थव्यवस्थेला फटका; चौथ्या तिमाहीत GDP घसरुन 3.1% वर; पूर्ण आर्थिक वर्षात विकास दर केवळ 4.2% राहणार)

जागतिक बँकेद्वारा प्रसारित करण्यात येणारा इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) वाढीचा दर मोठ्या प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. जीडीपी घसरणीचा दर हा 4.2% इतका दाखवण्यात आला आहे. विद्यमान आर्थिक वर्षात म्हणजेच 2020/21 मध्ये जीडीपी वृद्धीचा दर हा 3.2 टक्क्यांनी घसरेण असे जागतिक बँक सांगते. भारताचा जीडीपी वृद्धी दर घटण्याचे प्रमुख कारण कोरोना व्हायरस आहे. 1979 नंतर भारत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या घसरणीचा सामना करत असल्याचेही जागतिक बँक सांगतेल 1979 मध्ये भारताचा जीडीपी 5.24 % पेक्षाही खाली राहिला होता.

वर्ल्ड बँकेच्या निरिक्षणानुसार जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दरही सुरु असलेल्या वर्षात 5.2 टक्क्यांनी घसरेल. 1870 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घसरण होत आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नात 3.6 टक्क्यांची घसरण होऊन लोकांचे गरीब होण्याचे प्रमाण वाढण्याची अधिक शक्यता आहे.