Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,12,359 ; मागील 24 तासामध्ये वाढले 5,609 नवे रूग्ण
मागील 24 तासामध्ये देशात 5609 नवे कोरोबाधित रूग्ण (COVID 19 Positive) समोर आले आहेत. तर 132 जणांचा कोव्हिड 19 मुळे मृत्यू झाला आहे.
भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Cases) वाढत आहे. मागील 24 तासामध्ये देशात 5609 नवे कोरोबाधित रूग्ण (COVID 19 Positive) समोर आले आहेत. तर 132 जणांचा कोव्हिड 19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 112359 इतकी झाली आहे. दरम्यान यापैकी 63624 जणांवर उपचार सुरू असून 3435 कोरोनाबाधितांची कोरोना विरूद्धची लढाई अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आहेत. सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतामध्ये 31 मे पर्यंत चौथा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. यादरम्यान लहान मुलं, मधुमेह, उच्च रक्तदाब, हद्यविकार असे आजार असणार्या व्यक्ती, गरोदर महिला यांना बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. तर इतर नागरिकांसाठी सुरक्षेच्या गाईडलाईंन्स जारी करण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा सर्वाधिक धोका मुंबई सह महाराष्ट्राला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 39,297 च्या पार गेली आहे. तर महाराष्ट्रा खालोखाल तामिळनाडू, गुजरात, दिल्ली मध्ये रूग्णसंख्या 10 हजाराच्या पार गेली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंंडळ अध्यक्षपदी निवड; 22 मे ला स्वीकारणार पदभार.
ANI Tweet
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास काही प्रमाणात लॉकडाऊनमुळे यश आलं असलं तरीही देशात संसर्गाची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन भारताच्या आरोग्य यंत्रणेवर आहे. अद्याप कोव्हिड 19 या आजारावर ठोस उपचार किंवा लस नसल्याने त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणं कठीण आहे. जगभरात लस शोधण्यासाठी संशोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.