Coronavirus In India Updates: भारतात गेल्या 24 तासात 96,551 कोरोनासंक्रमितांची नोंद तर 1209 जणांचा बळी; देशातील COVID19 चा आकडा 45 लाखांच्या पार
त्यामुळे देशातील कोरोनासंक्रमिकांचा आकडा 45 लाखांच्या पार गेला आहे
जगभरासह भारतात (India) कोरोनाग्रस्तांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर आरोग्य मंत्रालयाने आज देशातील कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशात नव्याने 96,551 रुग्णांची नोंद झाली असून 1209 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील कोरोनासंक्रमिकांचा आकडा 45 लाखांच्या पार गेला आहे.(Coronavirus In India Updates: भारतात गेल्या 29 दिवसात 100% पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून डिस्चार्ज दिल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती)
देशात सध्या कोरोनाचे एकूण 45,62,415 रुग्ण संख्या आहे. त्यापैकी 9,43,480 अॅक्टिव्ह रुग्ण असून 35,42,664 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 76,271 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरसह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Health Ministry Issues Revised SOP: कोविड-19 संकट काळात पार पडणाऱ्या परीक्षांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना)
दरम्यान, केंद्राने काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार दिल्लीत मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात अद्याप मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता राज्य शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.