Coronavirus In India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 74281; मागील 24 तासांत 3525 नव्या रुग्णांची भर

मागील 21 तासांत देशात 3525 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 122 रुग्णांची मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 74281 इतकी झाली असून त्यापैकी 24386 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर 47480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतभर सातत्याने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 3525 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 122 रुग्णांची मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 74281 इतकी झाली असून त्यापैकी 24386 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर 47480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 2415 रुग्णांचा कोविड 19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. तर मुंबई, दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाची वाढती व्याप्ती पाहायला मिळत आहे. (महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? मुंबई, पुणे, नाशिक, सह जाणून घ्या कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश सध्या लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटासह विविध समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. मानवी जीवनावर ओढावलेल्या या भयंकर संकटाला समोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

ANI Tweet:

पहा देशातील विविध राज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी:

अनु. क्रमांक राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचे नाव एकूण पुष्टी केलेली प्रकरणे बरे / सोडण्यात आले / स्थलांतरित झाले मृतांची संख्या
1 अंदमान निकोबार 33 33 0
2 आंध्र प्रदेश 2090 1056 46
3 अरुणाचल प्रदेश 1 1 0
4 आसाम 65 39 2
5 बिहार 831 383 6
6 चंदीगड 187 28 3
7 छत्तीसगड 59 54 0
8 दादर नगर हवेली 1 0 0
9 दिल्ली 7639 2512 86
10 गोवा 7 7 0
11 गुजरात 8903 3246 537
12 हरियाणा 780 342 11
13 हिमाचल प्रदेश 65 39 2
14 जम्मू-काश्मीर 934 455 10
15 झारखंड 172 79 3
16 कर्नाटक 925 433 31
17 केरळा 524 489 4
18 लडाख 42 21 0
19. मध्य प्रदेश 3986 1860 225
20 महाराष्ट्र 24427 5125 921
21 मनिपूर 2 2 0
22 मेघालय 13 10 1
23 मिझोरम 1 1 0
24 ओडिशा 437 116 3
25 पाँडेचेरी 13 9 1
26 पंजाब 1914 171 32
27 राजस्थान 4126 2378 117
28 तामिळनाडू 8718 2134 61
29 तेलंगणा 1326 830 32
30 त्रिपूरा 154 2 0
31 उत्तराखंड 69 46 1
32 उत्तर प्रदेश 3664 1873 82
33 पश्चिम बंगाल 2173 612 198
एकूण 74281 24386 2415

कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा लवकरच होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनचा 4 चा कालावधी आणि स्वरुप येत्या 18 मे पूर्वी स्पष्ट होणार आहे.