Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत 9971 ने वाढ; देशातील कोविड-19 ग्रस्तांची संख्या 246628
मागील 24 तासांत कोरोनाग्रस्तांची संख्या 9971 ने वाढली आहे. तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असून आजही त्यात मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत कोरोनाग्रस्तांची संख्या 9971 ने वाढली आहे. तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 246628 वर पोहचला आहे. त्यापैकी 120406 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 119293 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात 6929 कोविड-19 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. देशासह महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल यांसह अनेक भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे. आताही महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असून त्यात दिवसागणित नवी भर पडत आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शनची खरेदी करणार आहे. (Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)
ANI Tweet:
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा लागू करण्यात आला आहे. परंतु, त्याचे स्वरुन काहीसे वेगळे आहे. त्यामुळे अनलॉक 1 च्या माध्यमातून अनेक सेवा-सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Mission Begin Again म्हणत दुकाने, जीम, शैक्षणिक संस्था, खाजगी कार्यालये यांना मुभा देली आहे. दरम्यान स्वच्छता आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.