Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 34 कोटींचा टप्पा; 76,472 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह 1,021 मृत्यू

त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.

वरील आकडेवारी पाहता देशात उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. तर मृत्यूदरही कमी झाला आहे. टेस्ट, ट्रॅस, ट्रिट या त्रिसुत्री च्या माध्यमातून गेल्या 5 महिन्यात तब्बल 3/4 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर 1/4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Unlock 4: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिम चालक, मालकांना दिलासा, म्हणाले 'सरकार सकारात्मक पण..')

ANI Tweet:

सध्या देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु आहे. लवकरच अनलॉक 4 ला सुरुवात होईल. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात नेमक्या कोणत्या सेवा सुरु होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाच्या लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.