Anil Vij COVID 19 Positive: Covaxin लस घेतली तरीही Coronavirus पॉझिटीव्ह आले हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज
अनिल विज यांच्या रुपात देशात असे पहिले उदाहरण पुढे आले आहे, ज्या व्यक्तीने कोरोना व्हायरस लस टोचून घेतली आहे त्याच व्यक्तीला कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे.
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Haryana Home Minister Anil Vij ) हे कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनावरील लस Covaxin ट्रायल चाचणीत त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. Covaxin लसीचा डोस त्यांनी स्वत:ला टोचून घेतला होता. तरीही विज यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह (Anil Vij Tests COVID 19 Positive) आली आहे. अनिल विज (Anil Vij) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन स्वत:च ही माहिती दिली आहे. अनिल विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यांना अंबाला छावने येथील नागरी रुग्णालयात व्हीआयपी वॉर्डमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना व्हायरस चाचणी करावी तसेच, स्वत:हून आयसोलेट व्हावे असे अवाहनही विज यांनी केले आहे.
प्राप्त माहिती अशी की, अनिल विज यांचे बंधू राजेंद्र विज हे विजय कुटुंबीयांतील पहिले कोरोना व्हायरस संक्रमित आढळले होते. अनिल विज यांच्या रुपात देशात असे पहिले उदाहरण पुढे आले आहे, ज्या व्यक्तीने कोरोना व्हायरस लस टोचून घेतली आहे त्याच व्यक्तीला कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine साठी फार वाट पहावी लागणार नाही तज्ञांच्या मते येत्या काही आठवड्यात तयार असेल; सर्वपक्षीय बैठकीत PM नरेंद्र मोदी यांची माहिती)
हरियाणामध्ये 20 नोव्हेंबरला कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा केली जाणारी लस 'कोवैक्सीन' चाचणी रुपात विज यांना टोचण्यात आली होती. अंबाला कँट येथील नागरी रुग्णालयात विज यांनी ही लस टोचून घेतली. पीजीआय रोहतक येथील एका पथकाच्या निरीक्षणाखाली आरोग्यमंत्री अनिल विज यांना 'कोवैक्सीन' लसीकरण करण्यात आले होते.