Coronavirus: दिल्लीत होम क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने विविध पोलीस स्थानकात 21 एफआयआर दाखल
त्यामुळे दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्सकडून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी काम करत आहेत. तसेच कोरोनाबाधितांसाठी रुग्णालयात विलगिकरण कक्षा सुद्धा देशातील विविध रुग्णालयात उभारण्यात आले आहेत. तसेच 14 दिवस क्वारंटाइन केल्यानंतर रुग्णाच्या हातावर शिक्का मारला जात आहे.
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्सकडून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी काम करत आहेत. तसेच कोरोनाबाधितांसाठी रुग्णालयात विलगिकरण कक्षा सुद्धा देशातील विविध रुग्णालयात उभारण्यात आले आहेत. तसेच 14 दिवस क्वारंटाइन केल्यानंतर रुग्णाच्या हातावर शिक्का मारला जात आहे. तसेच ज्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटारइनचा शिक्का आहे त्यांना घरीच आयसोशलन मध्ये रहावे अशा सुचना दिल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर दिल्लीत होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या काही जणांनी त्यासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात विविध पोलीस स्थानकात 21 एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील काही जणांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र होम क्वारंटाइन असताना नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे असून त्यांच्या विरोधात आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच भारतीय दंड संहिता आणि महामारी रोग अधिनियम कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Coronavirus in India: पश्चिम रेल्वे करणार 410 रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर)
दरम्यान, भारतात आतापर्यंत एकूण 2 हजार 301 रुग्ण COVID-19 आढळून आले आहेत. त्यापैंकी कोरोना विषाणूमुळे 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 155 कोरोनाबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील नागरिक घाबरले आहेत. देशात गेल्या 24 तासांत एकूण 235 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.