Coronavirus Death Rate: देशात मृत्युदर अवघा 1.76 टक्के, प्रति 10 लाख नागरिकांंमागे 48 मृत्यु- आरोग्य मंंत्रालय
भारताची लोकसंंख्या पाहता, प्रत्येकी 1 मिलियन म्हणजेच 10 लाख नागरिकांंमध्ये कोरोनामुळे केवळ 48 मृत्यु होत आहेत.
Coronavirus Update: देशात मागील 24 तासात कोरोनाचे 78,357 नवे कोरोना बाधित आढळून आले असुन एकुण कोरोनाबाधितांंची संख्या ही 37,69,524 वर पोहचली आहे. कालच्या दिवसात एकुण 1045 मृत्यु झाले असुन एकुण कोरोना बळींंचा आकडा 66,333 इतका झाला आहे. हे आकडे चिंंताजनक असुनही जगाच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंंत्रणात आहेत असेच दर्शवतायत. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या 1.76ं% इतका मृत्युदर आहे. तर हाच दर जागतिक स्तरावर 3.3% आहे. भारताची लोकसंंख्या पाहता, प्रत्येकी 1 मिलियन म्हणजेच 10 लाख नागरिकांंमध्ये कोरोनामुळे केवळ 48 मृत्यु होत आहेत तर जागतिक पातळीवर हाच दर प्रति 10 लाख नागरिकांंच्या मागे 110 मृत्यु होत आहेत.(देशात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अग्रस्थानी)
आज आरोग्य मंंत्रालयाने याचसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली होती, ज्यानुसार, कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51% रुग्ण हे 60 वर्षांवरील आहेत असे सांंगितले होते याशिवाय 36% कोरोना बळींंसह 45-60 वयोगटातील रुग्णांंचे मृत्युप्रमाण अधिक आहे.
ANI ट्विट
दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे 8,01,282 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 29,019,09 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.1 सप्टेंबर पासुन देशात अनलॉक 4 ची सुरुवात झाली आहे. मात्र 30 सप्टेंबर पर्यंत कंंटेनमेंट झोन मध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे.