Lockdown: कोरोना व्हायरस प्रसार तर थांबल नाहीच, अर्थव्यवस्थाही घसरली, लॉकडाऊन काळात झाली चूक; राहुल गांधी यांच्या सोबतच्या चर्चेत Rajiv Bajaj यांचे वक्तव्य
चर्चेदरम्यान, बोलताना राजीव बजाज म्हणाले पाश्चिमी राष्ट्रांचे अनुसरण करत भारताने देशात लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. लॉडाऊनमुळे कोरोना व्हायरस प्रसार थांबला नाहीच पण अर्थव्यवस्थाही अडचणीत आली.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उद्योगपती राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांच्याशी आज चर्चा केली. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट, लॉकडाऊन (Lockdown) आणि अर्थव्यवस्था हे या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे होते. चर्चेदरम्यान, बोलताना राजीव बजाज म्हणाले पाश्चिमी राष्ट्रांचे अनुसरण करत भारताने देशात लॉकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. लॉडाऊनमुळे कोरोना व्हायरस प्रसार थांबला नाहीच पण अर्थव्यवस्थाही अडचणीत आली.
राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेत राजीव बजाज बोलत होते. या वेळी बजाज म्हणाले, अनेक लोक स्पष्ट बोलत नाहीत. स्पष्ट बोलायला ते घाबरतात परंतू, अशा काळात आपण सहिष्णु आणि संवेदनशील राहायला हवे. त्यासाठी भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.
ट्विट
लॉकडाऊनबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना राजीव बजाज यांनी सांगितले की, पाश्चात्य देशांकडे पाहून खास करुन सृद्धढ पाश्चात्य देशांकडे पाहून आपण लॉकडाऊन लागू केला. पण आपण पूर्वेकडील देशांकडे पाहीले नाही. आव्हानात्मक लॉकडाऊन लागू केल्याने आपल्याला दोन्ही बाजूंनी नुकसान झाले. लॉकडाऊन लागू केल्याने कोरोना व्हायरस प्रसार वाढणे तर थांबले नाहीच. पण दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला. (हेही वाचा, India-China Border Dispute: सरकारने स्पष्ट सांगावे चीनी सैनिक भारतीय सीमेत घुसले आहेत किंवा नाही- राहुल गांधी)
ट्विट
राजीव बजाज यांनी पुढे बोलताना सांगितले की, मला वाटते की, पहिली समस्या ही आहे की लोकांच्या डोक्यातून भीती काढून टाकणे. ही भीती काढून टाकण्याबाबत पहिल्यांदा विचार होणे आवश्यक आहे. मला वाटते की, लोक पंतप्रधानांचे ऐकतात. अशा काळात त्यांनी नागरिकांना सांगणे गरजेचे आहे की जगभरातील अनेक देश आहेत जिथे सरकारने जे काही दिले आहे त्यातील दोन तृतियांश लोकांर्यंत पोहोचले आहे. मात्र आपल्याकडे सरकारने जे काही दिले आहे त्यातील केवळ 10% लोकांना मिळाले आहे.