Coronavirus: देशात लॉकडाऊन शिथिल मात्र कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येचे आव्हान कायम

त्यामुळे राज्यात आजपासून खासगी कार्यालयांमध्ये 10% कर्मचारी उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासोबतच राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय सुरु होत आहेत.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशात लागू असलेल्या लॉकडाऊन केंद्र आणि राज्य सरकारं हळूहळू शिथिल करत आहेत.  प्रदीर्घ काळ घरात बंद असलेले नागरिक, उद्योग-व्यवसाय आणि राज्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे एक दिलासादायक पाऊल आहे. मात्र, असे असतानाच राज्य आणि देशातील वाढती कोरोना व्हायरस (Coronavirus)  रुग्णांची संख्या मोठे आव्हान ठरताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 256611 वर पोहोचली आहे.गेल्या 24 तासात भारतात कोरोना व्हायरस संक्रमित 9983 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, एका बाजूला देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन (Lockdown) शिथल करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतला आहे. त्यामुळे या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जाता आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 9983 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 206 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 125381 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 124095 जणांना उपचारांतर बरे वाटू लागल्याने आणि त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. या 124095 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित मृतांचा आकडा 7135 वर पोहोचला आहे. (हेही वाचा, Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद)

एएनआय ट्विट

देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत असली तरीही केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आजपासून खासगी कार्यालयांमध्ये 10% कर्मचारी उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासोबतच राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय सुरु होत आहेत.

दरम्यान, राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय सुरु होत असला तरी, सरकारने घालून दिलेली काही बंधणे, नियम उद्योगजक, व्यावसायिक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी बाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे (वर्क फ्रॉम होम) असे बंधन सरकारने ठेवले आहे. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.