Coronavirus: गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितला COVID 19 वरील 'हा' आयुर्वेदिक उपचार! गोव्यातील शिक्षक महेश देगवेकर यांच्या दाव्याचा आयुष मंत्रालय करणार अभ्यास
गजानन महाराजांनी आपल्याला स्वप्नात येऊन कोरोनावरील आयुर्वेदिक उपचार सांगितल्याचे देगवेकर यांचे म्हणणे आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील तज्ञ मंडळी ही लस शोधण्यात दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशातच गोवा (Goa) राज्यातील शाळेत शिक्षकाची नोकरी करणाऱ्या महेश देगवेकर (Mahesh Degavekar) यांनी आपल्याला कोरोनावरील आयुर्वेदिक उपचार सापडल्याचा दावा केला आहे. गजानन महाराजांनी (Gajanan Maharaj) आपल्याला स्वप्नात येऊन कोरोनावरील आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment) सांगितल्याचे देगवेकर यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी देगवेकर यांनी आपल्याला आलेल्या प्रचितीबाबत आयुष मंत्रालयायला (Ayush Ministry) माहिती देताच केंंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी देगवेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. आता या दाव्याचा आयुष मंत्रालयाकडून अभ्यास केला जाणार आहे. महेश देगवेकर यांनी सांगितलेला उपचार आणि दावा काय आहे जाणुन घ्या..
देगवेकर यांंनी IANS ला दिलेल्या माहितीनुसार, "लिंबू आणि आल्याचा रस, लसणाच्या काही पाकळ्या आणि कारल्याचा रस मेथीच्या दाण्यांच्या पावडरमध्ये मिसळून औषध बनवता येईल, या औषधाचे परिणाम तीन दिवसात दिसून येतील. सहाव्या दिवशी कोरोना रुग्ण पूर्णपणे ठीक होईल. सातव्या दिवशी ती व्यक्ती घरी जाऊ शकते," Coronavirus: फक्त एक फोन करा! COVID-19 बाबतची शंका घरबसल्या दूर करा
"गजानन महाराज गेल्या आठ वर्षांपासून नियमितपणे त्यांच्यासमोर एक दिव्य दर्शन घेत आहेत आणि या प्रक्रियेमध्ये छातीत रक्तसंचय, प्रोस्टेट खराब होणे आणि उच्च रक्तदाब यावरील इतर आयुर्वेदांमध्ये आयुर्वेदिक उपचारही समाविष्ट आहेत. तर आता गजानन महाराजांच्या दूरदृष्टीने कोरोनावरील उपचार सापडला आहे असा दावा देगवेकर यांनी केला आहे". Coronavirus संकट काळात भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Ministry of AYUSH ने सुचवले हे नैसर्गिक उपाय!
दरम्यान, आयुष मंत्रालय अधिकारी श्रीपाद नाईक यांच्या माहितीनुसार आता देगवेकर यांनी सांगितलेला आयुर्वेदिक उपचार हा वैज्ञानिक अभ्यासासाठी पाठवला जाणार आहे. हा फॉर्म्युला कोरोनावरील काळजी घेण्याकडे जास्त लक्ष देते, यातून लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अशीही चिन्हे आहेत. त्यामुळे जरी वैज्ञानिक दृष्टीने कोरोनावरील उपचार म्ह्णून हा फॉर्म्युला सिद्ध झाला नाही तर प्रतिबंधात्मक उपाय म्ह्णून बघता येऊ शकतो असे श्रीपाद नाईक यांनी म्हंटले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नाईक यांनी बंगळुरुच्या डॉक्टरांचा हवाला देत प्रिन्स चार्ल्स यांच्यावर सुद्धा कोरोना झाला असताना आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करण्यातआल्याचा दावा केला होता.