Coronavirus: कर्नाटक येथे अवघ्या 10 महिन्याच्या मुलीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह

तर सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रदिवस काम केले जात असून विविध निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: फाइल फोटो)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तर सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रदिवस काम केले जात असून विविध निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसल्याने येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या काळात नागरिकांनी काहीही झाले तरीही घराबाहेर पडू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर कर्नाटक येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 च्या पार असून एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मात्र आता अवघ्या 10 महिन्याच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

कर्नाटक दक्षिण उपायुक्त सिंन्धू पी रुपेश यांनी कर्नाटकातील 10 महिन्याच्या मुलीला कोरोनाचे संक्रमण झाल्याची माहिती दिली आहे. साजीपांडू येथील सदर चिमुकली असून तिची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर जगभरातील वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञ कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्याला यश मिळू शकले नाही. कोरोना वायरस उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 3000 नागरिकांचा बळी गेला आहे. तर, जगभरातही या विषाणूने अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे(Coronavirus: दिल्ली येथे मोहोल्ला क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरला कोरोना व्हायरस संसर्ग)

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेला आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू आणि 66 जणांच्या प्रकृतीत सुधारणा आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गुजरात येथे 3 जण, कर्नाटक येथे 2 जण, मध्य प्रदेश, तमिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू कश्मीर आणि हिमाचल येथे प्रत्येकी 1-1 जणांचा मृत्यू झाला आहे.