Corona Vaccination Programme: तुमची मनपसंत कोरोना लस लवकरच उपलब्ध! भारत विदेशातूनही मागवणार COVID 19 Vaccine

वेगवेगळ्या देशांनी आपत्तालीन वापरासाठी परवानगी दिलेली लस भारतात आयात केली जाणार आहे. कोरोना लसीकरण (Vaccination Progrmme) उपक्रमात गतीमानता आणण्यासाठी हे पाऊल टाकले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास भारतीय नागरिकांना त्यांची मनपसंत लस टोचून घेता येणार आहे.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत आता भारत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकतो आहे. त्यासाठी केंद्र सरकार आता विदेशात निर्माण झालेली कोरोना लसही वापरण्याच्या विचारात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारत आता विदेशात निर्माण झालेली कोरोना लस (Corona Vaccine) आयात करणार आहे. वेगवेगळ्या देशांनी आपत्तालीन वापरासाठी परवानगी दिलेली लस भारतात आयात केली जाणार आहे. कोरोना लसीकरण (Vaccination Progrmme) उपक्रमात गतीमानता आणण्यासाठी हे पाऊल टाकले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास भारतीय नागरिकांना त्यांची मनपसंत लस टोचून घेता येणार आहे.

नॅशनल एक्‍सपर्ट ग्रुप ऑन वैक्‍सीन एडिमिनिस्‍ट्रशन फॉर कोविड-19 (NEGVAC) ची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात विदेशात निर्मिती झालेली तसेच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली लस भारता आयात केली जावी. यात USFDA, EMA, UK MHRA, PMDA, JAPAN शिवाय WHO च्या यादीत समाविष्ठ असलेल्या लसींचाही समावेश आहे.

NEGVAC चा प्रस्ताव भारत सरकारने मान्य केला आहे. NEGVAC ने असाही प्रस्ताव दिला आहे की, विदेशात बनलेली जी लस भारतात आयात केली जाईल ती पहिल्यांदा 100 नागरिकांना दिली जाईल. त्यानंतर त्या नागरिकांना 7 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. त्यानंतरच विदेशातून आयात केलेल्या लसींचे भारता वितरण केले जाईल. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत प्रचंड वाढ होते आहे. त्यामुळे देशात कोरोना लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरु लागली आहे. (हेही वाचा, Coronavirus In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील 50% कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग, न्यायाधीशांचे 'वर्क फ्रॉम होम'; व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होणार सुनावणी)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 97,168 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत 1,22,53,697 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण देशात 12,64,698 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशात आतापर्यंत 1,71,058 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10,85,33,085 नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्या आले आहे.