Delhi: काँग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अद्याप तरी म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. सन 2014 आणि त्यानंतर झालेल्या सन 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला.

Sonia Gandhi | (Photo credit: ANI)

काँग्रेस (Congress ) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालय (Sir Ganga Ram Hospital) येथे दाखल करण्यात आले आहे. नियमीत चाचणी आणि तपासणीसाठी सोनिया गांधी आज (गुरुवार, 30 जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. डी. एस. राणा (Dr D.S. Rana) यांनी दिली आहे. डॉ. राणा हे सर गंगाराम रुग्णालयाचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सोनिया गांधी या गेली अनेक वर्षे काँग्रेस अध्यक्ष पादाची जबाबदारी पार पाडत आहेत. सन 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा त्यांनी सूत्रे हाती घेतली. काँग्रेस अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांची राजकीय कारकीर्द यशस्वी राहिली. सोनिया गांधी यांच्य नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणूक सन 2004 आणि लोकसभा निवडणूक 2009 असा सलग दोन वेळा विजय मिळवला. या काळात पंतप्रधान होण्याची संधी असतानाही सोनिया गांधी यांनी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान केले. स्वत: मात्र पंतप्रधान होण्याचा मोह टाळला. त्यांच्या या निर्णयाची भारतासह जगभरात त्या वेळी चर्चा झाली.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरुन बाजूला होत पक्षाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अद्याप तरी म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. सन 2014 आणि त्यानंतर झालेल्या सन 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. (हेही वाचा, Rajiv Gandhi Foundation आणि गांधी कुटुंबातील 3 ट्रस्टींच्या फंडींगची होणार चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने नेमली समिती)

एएनआय ट्विट

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपच्या आक्रमक आणि झंजावती प्रचारापुढे कांग्रेस पक्षाला टीकाव धरता आला नाही. परिणामी पक्षाचा दारुन पराभव झाला. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या पराभवाची नैतीक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी स्वत: हूनच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीने एकमताने सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षाचे हंगमी अध्यक्ष केले. तेव्हापासून काँग्रेस पक्षाची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडे आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif