Congress President: राहुल गांधी यांच्या अनिच्छेनंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात; 20 सप्टेंबरच्या वेळापत्रकावर पक्ष ठाम

काँग्रेस पक्षाच्या निवड समितीने ( Congress Party's Election Authority) सांगितले की, कोणत्याही स्थितीत येत्या 20 सप्टेंबर पर्यंत काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष निवडण्यावर पक्ष ठाम असेल.

Congress | (File Image)

काँग्रेस अध्यक्ष (Congress president) पदासाठी निवडी प्रक्रिया रविवारपासून (21 ऑगस्ट) सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या निवड समितीने ( Congress Party's Election Authority) सांगितले की, कोणत्याही स्थितीत येत्या 20 सप्टेंबर पर्यंत काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष निवडण्यावर पक्ष ठाम असेल. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्वीकारावे असा पक्षातून आग्रह आहे. मात्र, राहुल गांधी यांनी त्याला फारशी उत्सुकता दर्शवली नाही. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून गांधी कुटुंबाबाहेरी व्यक्तीचा काँग्रेस विचार करत असल्याचे समजते.

पक्षाच्या केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या अंतिम तारखेला मंजुरी देणे हे काँग्रेस कार्यकारिणी (CWC) वर अवलंबून आहे. (हेही वाचा, Independence Day 2022: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाल्या 'सध्याचे आत्ममग्न सरकार स्वातंत्र्य सैनिकांना तुच्छ लेखत आहे')

गट समित्या आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रत्येकी एक सदस्याच्या निवडणुका 16 एप्रिल ते 31 मे 2022 या कालावधीत घेतल्या जातील असा CWC ने निर्णय घेतला होता. 1 जून ते 20 जुलै दरम्यान जिल्हा समिती प्रमुख आणि कार्यकारिणी, 21 जुलै ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान पीसीसी प्रमुख आणि AICC सदस्य आणि 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान AICC अध्यक्ष निवडले जातील, असेही सांगण्यात आले होते.

आम्ही निर्धारित वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करु. त्यासाठी निवड निवडणुकीचे वेळापत्रक आम्ही आगोदरच पक्ष नेतृत्वाकडे पाठवले आहे आणि CWC च्या मंजुरीची वाट पाहत आहोत. जे कॉंग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अंतिम तारखा निश्चित करेल, असेही मिस्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, ब्लॉक, जिल्हा आणि प्रदेश काँग्रेस समित्यांच्या स्तरावरील संघटनात्मक निवडणुका संपल्या आहेत का, असे विचारले असता, ते म्हणाले की प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तथापि, मिस्त्री म्हणाले की, निवड समिती एआयसीसी प्रतिनिधींना अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे जे पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी महत्त्वपूर्ण निवडणुकीत मतदान करतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif