Pegasus Snooping Controversy: पेगॅसस प्रकरण म्हणजे देशद्रोह, केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधकांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पेगॅसस प्रकरण म्हणजे देशद्रोह आहे. पेगॅससच्या रुपात पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांच्या मोबाईलमध्ये शस्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागमी राहुल गांधी यांनी या वेळी केली.

Rahul Gandhi | (Photo Credit : ANI)

पेगॅसस प्रकरणावरुन (Pegasus Scandal) देशभरातील विरोधी पक्ष एकवटला असून संसदेत आक्रमक भूमिका घेताना दिसतो आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात या प्रकरणाचे पडसाद जोरदार उमटले. दोन्ही सभागृहात विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन (Pegasus Snooping Controversy) चर्चेची मागणी केली. सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे विरोधकांनी सभागृहात कामकाज बंद पाडले. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह सर्व विरोधकांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पेगॅसस प्रकरण म्हणजे देशद्रोह आहे. पेगॅससच्या (Pegasus Spyware) रुपात पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) भारतीय नागरिकांच्या मोबाईलमध्ये शस्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागमी राहुल गांधी यांनी या वेळी केली.

राहुल गांधी प्रश्नार्थक भावमुद्रेत म्हमाले, जर पेगॅसस सारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा का हऊ नये? सरकार म्हणते की, आम्ही संसदेच्या कामात अडथळा आणतो आहे.पण, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो आहोत. या जबाबदारीला लोकशाही प्रकरियेच्या विरुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या वेळी म्हणाले. पेगॅससचा मुद्दा म्हणजे राष्ट्रद्रोहाचा मुद्दा आहे. हा देशाच्या विरोधातील विषय आहे आणि त्याला मोदी, शाह जबाबदार आहेत. या आधी काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनीही पेगॅसस पाळत प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा आणि सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Pegasus Snooping Controversy: पेगॅसस प्रकरणी राहुल गांधी लोकसभेत मांडणार स्थगन प्रस्ताव, 9 विरोधी पक्षांचा पाठिंबा)

एएनआय ट्विट

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खडगे यांच्या संसद संसद भवनातील कक्षात एक बैठक पार पडली. या बैठकीस राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल, द्रमुकचे टीआर बालू आणि इतर पक्षांचे नेते उपस्तित होते.

ट्विट

राहुल गांधी यांच्या प्रमाणेच इतरही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पेगॅसस मुद्द्यावर चर्चेसाठी सभागृहात स्थगन प्रस्ताव घ्यावा यासाठी नोटीस दिली. पेगॅसससह इतर मुद्द्यांवर पाठिमागील काही दिवसांपासून संसदेत सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा सामना दिसतो आहे. 19 जुलै पासून संसदेचे पावासाळी अधिवेशन सुरु झाले आहे. परंतू, एकही दिवस संसदेचे कामकाज सरगपणे सुरु राहू शकले नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now