National Herald case: राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले; काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन, प्रियंका गांधी यांचीही उपस्थिती

या चौकशीला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात दाखल झाले आहेत.

Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

Rahul Gandhi News Updates: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) प्रकरणात काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडी कार्यालयात आज चौकशी होणार आहे. या चौकशीला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी दिल्ली येथील अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात दाखल झाले आहेत. या वेळी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिपदर्शन केले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखलही झाले आहेत. त्यांची किती काळ चौकशी होते याबाबत उत्सुकता आहे.

राहुल गांधी हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यादेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे एकाच गाडीतून इडी कार्यालय आवारात दाखल झाले. राहुल गांधी इडी कार्यालयात गेले. प्रियंका गांधी बाहेर थांबल्या. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्तेही ईडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. त्यांना ईडी कार्यालयापासून साधारण एक किलोमीटर दूर अंतरावर बॅरिकेट्स लावून पोलिसांनी अडवले आहे. राहुल गांधी हे पायीचईडी कार्यालयात दाखल झाले. (हेही वाचा, Sonia Gandhi Admitted to Hospital: सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल; 2 जून रोजी झाली होती कोरोनाची लागण)

ट्विट

काग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, आम्ही अत्यंत शाततापूर्ण मार्गाने इडी कार्यालयात दाखल होऊ. आम्हाला अडविण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही अटक करुन घेऊ.

ट्विट

राहुल गांधी इईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, पोलिसांचे बॅरीकेट्स, ईडीच्या धमक्या, लाठीमार आणि पाण्याचे फवारे सत्याच्या लाटेला रोखू शकत नाहीत. सत्याचा आवाज घुमत राहिली. सत्याचा आवाज राहुल गांधीच आहे. ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली.