Congress leader Pawan Khera Arrests: काँग्रेस नेते पवन खेडा यांना विमानातून उतरवून अटक, असम पोलिसांची कारवाई
त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी या कारवाईचा निशेध केला. दरम्यान, पोलिसांनी पवन खेडा यांना विमानातून उतरवले आणि नंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात नेऊन अटक केली.
Congress leader Pawan Khera Arrested: काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेडा यांना दिल्ली येथून छत्तीसगडची (Chhattisgarh ) राजधानी रायपूर (Raipur) येथे जाण्यासाठी रोखण्यात आले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी या कारवाईचा निशेध केला. दरम्यान, पोलिसांनी पवन खेडा यांना विमानातून उतरवले आणि नंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात (Indira Gandhi International Airport Police Station) नेऊन अटक केली. काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय अधिवेशन रायपूर (Congress 85th plenary session, Raipur )येथे पार पडत आहे. या अधिवेशनासाठी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. पवन खेडा याच अधिवेशनासाठी निघाले होते. तत्पूर्वीच त्यांना अटक करण्यात आली.
अटकेबाबत सविस्तर माहिती देताना, असम पोलिसांचे आयजीपी एल अँड ओ आणि स्पॉक्स प्रशांत कुमार भुयान म्हणाले, काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम पोलिसांचे एक पथक रिमांड घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. पवन खेरा या प्रकरणाच्या संदर्भात. आम्ही दिल्ली पोलिसांना त्यांना (पवन खेरा) अटक करण्याची विनंती केली आहे. स्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही त्याला असामला आणू. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत उद्योगपतींचे प्रसारमाध्यमांवर नियंत्रण, राहुल गांधी यांचा घणाघात)
दरम्यान, पवन खेडा यांनी अटकेबाबत म्हटले आहे की, माझ्याकडे फक्त एक हँडबॅग असूनही तुमच्या सामानात समस्या आहे, असे मला सांगण्यात आले होते. मला विमानातून उतरविण्यात आले. विमानातून खाली उतरल्यावर आता तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, असे मला सांगण्यात आले. पुढे बोलताना खेडा म्हणाले, मी कोणताही कायदा मोडला नाही. त्यामुळे मी कोणत्याही कारवाईपासून मागे हटणार नाही. माझ्यावर जी काही कारवाई होईल, त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी असल्याचेही ते म्हणाले.