Congress Announces Nationwide Protest: कॉंग्रेसकडून 22 ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाची घोषणा; SEBI प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

वेणुगोपाल यांनी सांगितले की, आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली एआयसीसी सरचिटणीस, प्रभारी आणि पीसीसी अध्यक्षांची बैठक झाली. आम्ही सध्या देशात घडत असलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक, हिंडेनबर्ग खुलासे, अदानी आणि सेबीशी संबंधित घोटाळ्याबद्दल चर्चा केली.

Congress (Photo Credit- PTI)

Congress Announces Nationwide Protest: हिंडेनबर्ग (Hindenburg) आरोपानंतर सेबी (SEBI) प्रमुखांना हटवण्याची मागणी करत, काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 22 ऑगस्ट रोजी देशभरात एक मोठे राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन केले जाणार आहे. ते प्रत्येक राज्याच्या राजधानीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाला घेराव घालणार आहेत आणि त्याद्वारे सेबी अध्यक्षांना हटवण्याची मागणी केली जाणार आहे.

आज, मंगळवारी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत पक्ष संसदेत विधेयक आणून, एससी-एसटी आरक्षणातील क्रीमी लेयरच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचेही ठरले आहे. यासोबतच एससी-एसटी आरक्षणातील कोट्याच्या मुद्द्यावर एक समिती स्थापन करण्यात येणार असून ती सर्वांशी चर्चा करून अहवाल सादर करेल.

वेणुगोपाल यांनी सांगितले की, आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली एआयसीसी सरचिटणीस, प्रभारी आणि पीसीसी अध्यक्षांची बैठक झाली. आम्ही सध्या देशात घडत असलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक, हिंडेनबर्ग खुलासे, अदानी आणि सेबीशी संबंधित घोटाळ्याबद्दल चर्चा केली. या प्रश्नावर आम्ही देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोन मागण्या आहेत, पहिली म्हणजे, सेबीच्या प्रमुखाने पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसरी- अदानी मेगा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्यात यावी. (हेही वाचा; BJP On Hindenburg Report: आर्थिक अराजकता, भारताविरुद्ध द्वेष निर्माण करण्यात काँग्रेसचा हात; हिंडेनबर्ग अहवालावर भाजपचा दावा)

बैठकीनंतर राहुल गांधी यांना हिंडेनबर्ग अहवालाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही खूप खोलवरची बाब आहे. मी रस्त्यावर याबद्दल बोलणार नाही. मी या विषयावर पत्रकार परिषद घेऊन माझे म्हणणे मांडणार आहे. दरम्यान, अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. हिंडेनबर्गने शनिवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये फेरफार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, अस्पष्ट ऑफशोअर फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला होता. सेबीने अदानीच्या मॉरिशस आणि ऑफशोअर शेल संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात स्वारस्य दाखवले नाही, असा आरोप फर्मने केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now