अयोध्या राम मंदिरचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार - नृपेंद्र शर्मा यांची माहिती
ही नावे अद्याप ठरलेली नाहीत.
श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समिती चे चेअरमन नृपेंद्र शर्मा (Ram Janmabhoomi Temple Construction Committee Chairman Nripendra Mishra) यांनी अयोध्येमधील श्रीराम मंदिर जून 2025 पर्यंत बांधून पूर्ण झाले असेल अशी माहिती दिली आहे. नृपेंद्र मिश्रा यांनी शनिवारी एल अँड टी आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेडचे अधिकारी आणि मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ट्रस्टच्या सूत्रांच्या मते, विविध प्रलंबित बांधकाम कामांसाठी संभाव्य मुदत निश्चित करण्यात आला आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू संतांच्या मंदिरांमध्ये पुष्करी नावाच्या तलावाचे बांधकाम सुरू आहे. 2025 जूनपर्यंत हिंदू संतांची सहा मंदिरे, एक तलाव आणि एक किलोमीटर लांबीची तटबंदी पूर्ण होईल.
याशिवाय मंदिर परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी रामनवमीपूर्वी मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या बैठकीत वरील सर्व बाबींवर बांधकाम समितीचे अध्यक्ष व बांधकाम संस्थांच्या जबाबदार लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
70 एकरच्या मंदिर संकुलातील 40 एकर जागा हरित क्षेत्रासाठी ठेवली जाणार आहे. यापैकी १८ एकरातील हरितिका मार्चपर्यंत तयार होईल. सप्तर्षी मंदिर पूर्ण झाल्यानंतर, मध्ये एक सुंदर पुष्करिणी (फुलांनी भरलेले तलाव) बांधले जाईल. बैठकीत उपस्थित श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त अनिल मिश्रा यांनी वरील माहिती दिली.