Commercial LPG Cylinder Price In New Year: एलपीजी सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी Indian Oil कडून ग्राहकांना दिलासा

नव्या वर्षात पदार्पण करताच कमर्शिअल एलपीजी सिलींडर (Commercial LPG Cylinder Price) दरात कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही कपात 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे.

LPG Cylinder Price Hike (Photo Credits: ANI)

नव्या वर्षात (New Year 2022) ऑनलाईन फूड डिलिव्हरी, एटीएम ट्रांजेक्शन्स यांसारख्या गोष्टी महागल्या असल्या तरी इंडियन ऑईल कंपनीने मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काहीसा दिलासा दिला आहे. नव्या वर्षात पदार्पण करताच कमर्शिअल एलपीजी सिलींडर (Commercial LPG Cylinder Price) दरात कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही कपात 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे.

IOCL ने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2022 ला दिल्ली येथे कमर्शिअल गॅसची किंमत 102 रुपयांनी घटलून ती 1998.5 रुपये झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत 19 किलोग्रँम सिलिंडरसाठी दिल्लीत 2101 रुपये मोजावे लागत होते. चेन्नई 19 किलोग्रॅम एलपीजी गॅसची किंमत 2131 तर मुंबईमध्ये 1948.50 रुपये द्यावे लागतील. नवे दर लागू झाल्यापसून कोलकातमध्ये काॅमर्शियल गॅस सिलिंडर दर आजपासून 2076 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. (हेही वाचा, New Rules From 1st January 2022 : Online Food Delivery, ATM Transactions महागले; आज एक जानेवारीपासून बदलणारे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का? घ्या जाणून)

नव्या वर्षात बदललेले शहरनिहाय सिलेंडर दर (14.2 Kg)

दिल्ली- 900

मुंबई- 900

कोलकाता- 926

चेन्नई- 916

लखनऊ- 938

जयपुर- 904

पटना- 998

इंदौर- 928

अहमदाबाद- 907

पुणे- 909

गोरखपुर- 962

भोपाल- 906

आगरा- 913

रांची- 957

नववर्षात गॅस कंपन्यांनी केलेली एलपीजी सिलेंडर दरकपातही केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आहे. त्यातही ही कपात 19 किलो च्या सिलिडरवर आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now