नौगाममध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला ; CISF अधिकारी शहीद
हल्ला करणारे दहशतवादी त्याच परिसरात लपलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
श्रीनगरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये सुरक्षेसाठी तैनात अधिकाऱ्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी त्याच परिसरात लपलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पहारा दिला असून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरु आहे.
दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात पॉवर ग्रीनच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार शहीद झाले.
दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अभिनाय सुरु केले आहे. म्हणूनच दहशतवादी चिडून असा हल्ला करण्याची संधी शोधत असतात.