Arunachal Pradesh चा हरवलेला Sh Miram Taron सापडला; Indian Army कडून तपासणी सुरू असल्याचा Chinese PLA चा दावा
Sh Miram Taron हा 17 वर्षीय मुलगा अरूणाचल प्रदेश मधून 18 जानेवारीला हरवला आहे. त्याच्या मित्राने ही माहिती प्रशासनाला दिली होती.
अरूणाचल प्रदेश ( Arunachal Pradesh) मध्ये Line of Actual Control पार केलेल्या भारतीय मुलाचा शोध लागला आहे. चीनच्या People's Liberation Army कडून आज (23 जानेवारी) हा दावा करण्यात अअला आहे. भारतीय लष्करासोबत बोलताना त्यांनी भारतीय मुलाचा शोध लागला असून त्याला सार्या फॉर्मेलिटीज पूर्ण केल्यानंतर स्वदेशी पाठवले जाईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान इंडियन आर्मी कडून तो हरवलेलाच भारतीय मुलगा आहे का? याची तपासणी सुरू आहे. या मुलाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराने PLA कडे मदत मागितली होती. या मुलाचं नाव MSh Miram Taron आहे.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, त्यांना Sh Miram Taron बाबत कळल्यानंतर त्यांनी पीएलए सोबत संपर्क केला. तो हर्ब्स गोळा करण्यासाठी गेला असताना हरवला आणि परत आलेला नाही. दरम्यान अरूणाचल प्रदेशकडून चीनने त्याचं अपहरण केला असल्याचाही दावा केला होता. तसे ट्वीट Tapir Gao यांनी केले होते. हे देखील नक्की वाचा: China Army Kidnaps Teen From Arunachal: चीन आर्मीकडून भारतीय 17 वर्षीय भारतीय तरुणाचे अपहरण; अरुणाचल प्रदेश राज्यातील घटना.
Taron सोबत असणारा त्याचा मित्र Johny Yaiying स्वतःची सुटका करण्यामध्ये यशस्वी ठरला त्यानेच पीएलए कडून Taron चं अपहरण झाल्याची माहिती प्रशासनाला दिली. Tsangpo नदीजवळ हा प्रकार घडल्याचं तो सांगतो. या नदीला आसाम मध्ये ब्रम्हपुत्रा तर अरूणाचलप्रदेश मध्ये Siang म्हणतात. Johny Yaiying ने मित्राच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विनंती केली आहे.
भारत आणि चीन मध्ये सीमारेषेवरून मागील 20 महिन्यांपासून संबंध तणावपूर्ण आहेत. यावर सांमजस्याने मार्ग काढण्यासाठी 14 मिलिट्री टॉक्स झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)