China Army Kidnaps Teen From Arunachal: चीन आर्मीकडून भारतीय 17 वर्षीय भारतीय तरुणाचे अपहरण; अरुणाचल प्रदेश राज्यातील घटना

रुणाचल प्रदेशचे खासदार तीपर गाओ (Tapir Gao) यांनी बुधवारी म्हटले की, चीनी सेना पीएलए ने मंगळवारी सेउंगला परिसरातील एका लुंगटा जोर परिसरातून या मुलाचे अपहरण केले मिराम टॅरॉन असे या मुलाचे नाव आहे.

Miram Taron | (Photo Credit: Credit - Twitter)

चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने अरुणाचल प्रदेश राज्यातील सियांग (Arunachal Pradesh) जिल्ह्यातील एका 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आहे. अरुणाचल प्रदेशचे खासदार तीपर गाओ (Tapir Gao) यांनी बुधवारी म्हटले की, चीनी सेना पीएलए ने मंगळवारी सेउंगला परिसरातील एका लुंगटा जोर परिसरातून या मुलाचे अपहरण केले मिराम टॅरॉन असे या मुलाचे नाव आहे. गाओ यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दितेना सांगितले की, टॅरोन याचा मित्र जॉनी एईंग याने पीएलएकडून त्याचे अपहरण झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

खासदारांनी पुढे म्हटले की, ही घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी त्सांगपो नदी अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते. त्सांगपो नदीला अरुणाचल प्रदेशात शिंयांग आणि असममध्ये ब्रम्हपूत्रा म्हटले जाते. या आधी खासदार गाओ यांनी ट्विट करत म्हटले की, चीनी पीएलएने जिदो गावच्या 17 वर्षीय मिराम तारोन याचे अपहरण केले. पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात 'या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आपण सर्व भारतीय यंत्रणांना अवाहन करतो. गाओ यांनी असेही म्हटले की, त्यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री निसिथ प्रमाणिक यांना घटनेबाबत माहिती दिली आहे. तसेच, खासदारांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय लष्कराला टॅग केले आहे. (हेही वाचा, World's Richest Nation: अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश; जाणून घ्या किती आहे संपत्ती)

ट्विट

चीनकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनच्या पीएलएने या आधीही अशा प्रकारची कृत्ये केली आहेत. सप्टेंबर 2020 मध्येही चीन असा वागला आहे. तेव्हा पीएलएने अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केले होते. त्यानंतर जवळपास एक आठवड्यांनी त्यांची सूटका करण्यात आली होती.