Chhattisgarh Shocker: दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांना वेगवान कारने चिरडले; पहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी तर 26 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Accident (Photo Credits: Video Screengrab)

छत्तीसगढच्या (Chhattisgarh) जशपूर (Jashpur) जिल्ह्यात एका वेगाने जाणाऱ्या कारने लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी तर 26 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. ही घटना छत्तीसगडच्या जशपूरमधील पाथळगावची आहे. शुक्रवारी सुमारे 100-200 लोक  दुर्गाच्या विसर्जनासाठी जात असताना मागून येणाऱ्या एका वेगवान कारने लोकांना चिरडले.

मीडिया रिपोर्टनुसार, ही कार गांजाने भरलेली होती आणि तस्कर ओडिशाहून मध्य प्रदेशातील सिंगरौली घेऊन जात होते. या घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी कारला आग लावली आणि कारमधील दोन आरोपींना बेदम मारहाण केली.

पहा व्हिडिओ:

प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दोन्ही आरोपींनी या प्रवासादरम्यान आधी कुणाला तरी उडवले होते. काही लोक त्याचा पाठलाग करत होते आणि त्यामुळेच गाडीचा वेग खूप जास्त होता. मात्र, यापूर्वी या दोन आरोपींनी ज्या कारला चिरडले होते, त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दोन्ही आरोपी लोकांना चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सुमारे 5 किमीपर्यंत कारचा पाठलाग केला. त्यानंतर सुखरापारा येथे कार चालकाला पकडून त्यांना जबर मारहाण केली. तसंच संतापलेल्या लोकांनी कारला आग लावली.

आरोपींना जमावापासून वाचवण्यासाठी स्थानिक पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. जमावापासून वाचवताना पोलिसांनी आरोपींना रायगड जिल्ह्यातील कापु पोलीस ठाण्यात आणले आहे. लोकांचा रोष पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif