Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमध्ये पत्नीचे पाच तुकडे करुन पाण्याच्या टाकीत लपवले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बिलासपुर पोलिसांना या व्यक्तीच्या घरात बनावट नोटा तयार केल्या जातात अशी माहिती मिळाली होती त्या माहितीवरुन पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने घरावर धाड घातली.

Chhattisgarh Shocker:  छत्तीसगडमध्ये पत्नीचे पाच तुकडे करुन पाण्याच्या टाकीत लपवले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका 32 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या पत्नीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. ही हत्या लपवण्यासाठी त्याने पत्नीच्या शरिराचे पाच तुकडे करुन घरातील पाण्याच्या टाकीत लपवले होते. (Chhattisgarh man chops wife into 5 pieces) पोलिसांनी त्याच्या घरातून पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले असून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बिलासपुरचे (Bilaspur ) पोलीस अधिकारी संतोष सिंग यांनी या घटनेची माहिती दिली.  (Mumbai Shocker: नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागात 100 महिलांना पाठवले अश्लिल मेसेज; आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या)

बिलासपुर पोलिसांना या व्यक्तीच्या घरात बनावट नोटा तयार केल्या जातात अशी माहिती मिळाली होती त्या माहितीवरुन पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने घरावर धाड घातली. यावेळी पोलिसांना एका बंद खोलीतून दुर्गंध येत असल्याचे समजले या खोलीतील बाथरुममध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीतून त्यांना मृतदेहाचे तुकडे मिळाले. हा मृतदेह आरोपीची पत्नी सती साहू (26) हिचा होता. या मृतदेहाच्या तुकड्यांना प्लॅस्टीकमध्ये बांधले होते.

आरोपीला पोलिसांनी त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले असून या घरात बनावट नोटा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलर प्रिटंर, पेपर आणि काही 500 आणि 200 च्या बनावट नोटा देखील ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी आरोपीने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अवैध्य संबध होते म्हणून तिची हत्या केल्याचे मान्य केले.

आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्राचा शोध घेणे हे सुरु आहे. तसचे बनावट नोटा प्रकरणी देखील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2023 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).