छत्तीसगढ येथे दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या,पोलिसांकडून अधिक तपास सुरु
छत्तीसगढ (Chhattisgarh) येथील जशपुर मध्ये एका 10 वीच्या (SSC) विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
छत्तीसगढ (Chhattisgarh) येथील जशपुर मध्ये एका 10 वीच्या (SSC) विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. तर परिक्षेचा पेपर सुरु होताच तेथे उपस्थित असलेल्या निरिक्षकांनी विद्यार्थांनी कॉपी करु नये म्हणून त्यांची तपासणी सुरु केली होती. त्यावेळी या विद्यार्थिनीची सुद्धा तपासणी करण्यात आली.
असे सांगितले जात आहे की, परिक्षा निरिक्षकांनी विद्यार्थिनीला तिचे कपडे काढून तपासणी केली. त्यामुळे बोर्ड परिक्षेच्या वेळी अशा पद्धतीने निरिक्षकांकडून तपासणी केल्यामुळे विद्यार्थिनी खुपच निराश झाली होती. या कारणामुळे तिने आत्महत्या करण्याचा विचार केला.
किशोरवस्थेत मुलांची मनस्थिती अत्यंत नाजूक असते. त्यामुळे या वयातील मुले कोणतीही गोष्ट त्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्यास त्यावर आपण चिडलो किंवा रागवलो तर ती मनावर घेतात. त्यामुळे अशाच पद्धतीची वागणूक विद्यार्थिनीला मिळाल्याने विद्यार्थिनीने चुकीचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपासणी सुरु असल्याचे रवी मित्तल यांनी म्हटले आहे.