IPL Auction 2025 Live

छत्तीसगढ़: रायगढ येथील पेपर मिल मधून गॅस गळती, 7 कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल; 3 जणांची प्रकृती गंभीर

मिल मधील टाकीची साफसफाई सुरु असताना गॅस गळती झाली.

People Hospitalised. (Photo Credits: ANI/ Representational Image)

छत्तीसगढ मधील रायगढ जिल्ह्यात पेपर मिलमधील गॅस गळतीमुळे 7 कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिल मधील टाकीची साफसफाई सुरु असताना गॅस गळती झाली. त्या गॅसच्या संपर्कात आल्याने कामगारांची प्रकृती बिघडली असल्याने 7 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अशी माहिती रायगढचे पोलिस अधीक्षक यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच रायगढचे पोलिस अधीक्षक संतोष सिंह आणि जिल्हाधिकारी यशवंत कुमार यांनी रुग्णालयात जावून पीडितांची भेट घेतली. पोलिसांना माहिती न देता घटना लपवण्याचा प्रयत्न मिलच्या मालकांनी केला. परंतु, आता गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस अधीकक्षकांनी सांगितले.

विशाखापट्टणम मध्ये LG Polymers plant मधून गॅस लिक झाल्याच्या दुर्घटनेनंतर लगेचच गॅसगळतीची ही दुसरी घटना समोर आली. विशाखापट्टणम मधील गॅस गळतीच्या दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेला असून 800 जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी रुग्णालयात जावून पीडितांची भेट घेतली. तसंच यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. (आंध्र प्रदेश: विशाखापट्टणम मध्ये LG Polymers Industry मधून विषारी वायू गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू; 5 गावं सुरक्षेच्या कारणास्तव रिकामी)

ANI Tweet:

विशाखापट्टणम मधील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसंच लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. विशाखापट्टणम येथील घटनेनंतर छत्तीसगड मधील वायू गळती ही आजच्या दिवसभरातील दुसरी वायु गळतीची दुर्घटना आहे.