NEET 2022 Exam: नीट परीक्षेत अपयश, 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या
लक्ष्मण श्वेता असे या मुलीचे नाव आहे ती चेन्नईतील (Chennai) तिरुमुल्लेवोयल (Thirumullaivoyal) येथील राहणारी आहे.
नीट (NEET ) परीक्षेत आलेल्या अपयशाने खजून जावून एका 19 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. लक्ष्मण श्वेता असे या मुलीचे नाव आहे ती चेन्नईतील (Chennai) तिरुमुल्लेवोयल (Thirumullaivoyal) येथील राहणारी आहे. पाठिमागील काही दिवसांपासून श्वेता ही राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (National Eligibility Cum Entrance Test) म्हणजेच नीट परीक्षेची (NEET Exam) तयारी करत होती. पूर्वतयारी करुनही परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली.
एमबीबीएस (MBBS) आणि तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्राप्त माहितीनुसार, श्वेता ही एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुलगी होती आणि तिने 2019 मध्ये इयत्ता 12 वी पूर्ण केली. सध्या ती फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासही करत होती. र फिलीपिन्सला जाण्यापूर्वी ती तिच्या आईसोबत राहत होती. दोघी वडीलांपासून वेगळ्या राहतात. (हेही वाचा, Suicide: बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने 19 वर्षीय विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या)
पोलिसांनी माहिती देताच सांगितले की, परीक्षेत अपयश आल्यानंतर ते श्वेताला पचवता आले नाही. तिने हॉलमध्ये शालीने गळफास लावून घेतला आणि तिचा मृत्यू झाला. तिची आई आई अमुदा यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी 3:30 वाजता रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेतून श्वेता हीला तातडीने किलपॉक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (KMCH), किलपॉक, चेन्नई, येथे उपचासासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या आधीही 2 सप्टेंबर रोजी NEET ची तयारी करत असलेल्या 21 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यानीने आत्महत्या केली होती. राजलक्ष्मी असे तिचे नाव होते. सलग तिसर्यांदा NEET ची परीक्षा देणाऱ्या राजलक्ष्मीने NEET ची उत्तरपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यानंतर ती परीक्षा पास करू शकणार नाही आणि वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही या भीतीने आत्महत्या केली होती.