चांद्रयान-3 मोहीम भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा स्तर उंचावेल- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्टार्टअप्समधील सहकार्याचा स्तर उंचावेल.

Chandrayaan 3 (Photo Credit - Twitter)

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्टार्टअप्समधील सहकार्याचा स्तर उंचावेल. अमेरिकेचे नासा आणि भारताचे इस्रो मानवी अंतराळ उड्डाण सहकार्यासाठी एक धोरणात्मक आराखडा विकसित करत आहेत आणि नासा आज भारताच्या अंतराळवीरांची प्रशंसा करत आहे असे जितेंद्र सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताने आर्टेमिस करारावरही स्वाक्षरी केली, ज्यामध्ये सर्व मानवजातीच्या हितासाठी अंतराळ संशोधनाप्रति एक समान दृष्टीकोन मांडला आहे असे सिंह म्हणाले.

भारत आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी आज संयुक्तपणे "महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान : क्वांटम टेक्नॉलॉजीज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग लाइव्हज" या विषयावर सहकार्यात्मक प्रस्तावांसाठी आवाहन केले, त्यावेळी ते बोलत होते. भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंच (IUSSTF) आणि USISTEF च्या सचिवालयाने हा कार्यक्रम आखला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या नंतर हे पाऊल उचलण्यात आले असून या दौऱ्यात त्यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक सहकार्याच्या नव्या अध्यायावर भर दिला होता, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका या उभय देशांच्या नेत्यांचे निर्णय अंमलबजावणीच्या पातळीवर पुढे नेण्यासाठी त्वरीत पावले उचलल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

भारत -अमेरिकन प्रतिबद्धतेने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (अमेरिका – भारत) संबंधांना एक नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा देऊन भविष्यासाठी तंत्रज्ञान सहकार्य तयार केले आहे, याकडे डॉ जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, इतर तंत्रज्ञान-केंद्रित बाबींमध्ये उच्च प्रासंगिकतेसंदर्भात हे लक्षात घेणे आनंददायी आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी, संयुक्त विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणासाठी अमेरिका -भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुदान निधी (युएसआयएसटीईएफ ) अंतर्गत 2 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स अनुदान कार्यक्रमाचे स्वागत केले, आणि भारतात उच्च कार्यक्षमता कॉम्पुटिंग (एचपीसी ) सुविधा विकसित करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी सहकार्यांना प्रोत्साहन दिले.

भारताने अलीकडेच राष्ट्रीय क्वांटम अभियानाला (एनक्यूएम ) मान्यता दिली आहे . क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे बीजारोपण करणे ते विकसित करणे आणि प्रगती करणे आणि त्याच्याशी संबंधित एक सचेत आणि सर्जनशील व्यवस्था निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जगातील सर्वात गंभीर आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे आणि आर्थिक विकासासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानातील गुंतवणूकीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तनशील प्रगती होईल आणि आरोग्यसेवा, कृषी, हवामान बदल आणि बहुतांश क्षेत्रात प्रभाव पडल्यामुळे आपल्या सामाजिक कल्याणासाठी याचा खूप फायदा होईल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. अनुदान निधीच्या परिवर्तनीय क्षमतेचे त्यांनी स्वागत केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif