Lok Sabha Elections 2019: चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मी मिशनचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा

भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, भीम आर्मीने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकासआघाडी व मित्रपक्षांच्या महाआघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

Congress-NCP Alliance in Maharashtra | (Only representative image)

Lok Sabha Elections 2019: अनेक दलित पक्ष संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात किंवा स्वतंत्र आघाडी स्थापन करुन लोकसभा निवडणूक लढत आहेत. असे असताना चंद्रशेखर आजाद (Chandrashekhar Azad) यांच्या भीम आर्मी एकता मिशनचा (Bhim Army Bharat Ekta Mission) मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला (Congress-NCP Alliance) पाठिंबा मिळाला आहे. भीम आर्मी (Bhim Army) महाराष्ट्र प्रदेशने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, भीम आर्मीने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकासआघाडी व मित्रपक्षांच्या महाआघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे.  (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: पार्थ पवार यांचा बालेकिल्ला राज ठाकरे लढवणार? अजित पवार यांनी दिले संकेत)

महाराष्ट्रात दलित वर्गाचा मोठा पाठिंबा असलेला आरपीआय (आठवले गट) हा भाजप-शिवसेना पक्षासोबत आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ हा प्रकाश आंबेडकर हेच सर्वेसर्वा असलेल्या वंचित बहूजन आघाडीसोबत स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. भीम आर्मीचे महाराष्ट्रात तसे फारसे जाळे नाही. तरीही काही प्रमाणात का होईना काँग्रेस राष्ट्रवादीला या पाठिंब्याचा फायदा होऊ शकते, अशी चर्चा आहे.