PF चा व्याजदर आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्क्यांवर कायम
आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन पाहणार्या संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने या वर्षासाठी व्याजदर पूर्वीप्रमाणेच 8.50% इतका कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 मधील व्यजदराबाबत आज माहिती दिली आहे. आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन पाहणार्या संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने या वर्षासाठी व्याजदर पूर्वीप्रमाणेच 8.50% इतका कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे. नागील आर्थिक वर्षामध्ये देखील हा व्याजदर 8.50% इतकाच कायम ठेवण्यात आला होता.
मागील वर्षभर कोरोना संकटामुळे अर्थ व्यवस्था गडगडल्याने आणि नोकर्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने या वर्षी व्याजदर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र व्याजदर कायम ठेवण्यात आले आहे. अनेकांनी कोरोना संकटामध्ये आर्थिक चणचण दूर करण्यासाठी पीएफ अकाऊंटमधून मोठी रक्कम काढली होती. PF Balance Check: तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? एका मिस्ड कॉलवर मिळवा संपूर्ण माहिती.
ANI Tweet
228 व्या सेंट्रल बोर्ड ऑफ़ ट्रस्ट्रीजच्या श्रीनगर मध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. दरम्यान या बैठकीत केंद्रीय मंत्री संतोष गंगवार देखील उपस्थित होते. त्यांनी मिटिंगचे अध्यक्षपद भूषवले होते.