CCL For Male Central Government Employees: केंद्र सरकार कडून Single Male Parent साठी मोठा निर्णय; जाणून घ्या सीसीएल नेमकं कोण घेऊ शकतं, पगार कसा मिळणार आणि इतर फायदे!
त्याचे नियम काय असतील? पगार कसा दिला जाणार याबाबतच्या तुमच्या मनातील काही शंका दूर करण्यासाठी ही माहिती नक्की वाचा.
केंद्र सरकारी कर्मचार्यांसाठी आता मोदी सरकारने एक मोठी दिलासादायक बातमी आहे. नव्या नियमांनुसार महिलांसोबतच सिंगल पेरंट (Single Male Parent) असलेल्या पुरूष कर्मचार्यांनादेखील आता सीसीएल म्हणजेच चाईल्ड केअर लिव्ह (Child Care Leave) घेण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता मात्र काही नियामांमध्ये बदल करत तो पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार आता पुरूष कर्मचारीदेखील सीसीएल (CCL) घेऊ शकतात असा निर्णय DOPT ने घेतला आहे. याची माहिती सोमवार, (26 ऑक्टोबर) दिवशी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह(Jitendra Singh)यांनी जाहीर केला आहे.
आता केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे नेमकी कोण सीसीएल लिव्ह घेऊ शकतात. त्याचे नियम काय असतील? पगार कसा दिला जाणार याबाबतच्या तुमच्या मनातील काही शंका दूर करण्यासाठी ही माहिती नक्की वाचा.
कोणते पुरूष सीसीएल लिव्ह घेऊ शकतात?
केंद्र सरकारने आता सीसीएल लिव्ह पुरूषांसाठी देखील लागू केली आहे. पण त्यामध्ये Single male parent ची अट आहे. म्हणजेच मुलांच्या देखभालीसाठी अविवाहीत पुरूष, विधूर, घटस्फोटित पुरूष सीसीएल घेऊ शकतात. या सुट्टीचा फायदा घेत मुलांच्या देखभालीकडे लक्ष देता येणार आहे.
सीसीएल लिव्ह घेणार्यांसाठी इतर फायदे
सीसीएल घेणार्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना पहिल्या वर्षाच्या सुट्टीच्या कालावधीसाठी 100% पगार दिला जाणार आहे. तर दुसर्या वर्षी घेताना 80% पगार दिलाजाणार आहे. तसेच मूल जर दिव्यांग असेल तर केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना थोडे अधिक फायदे देण्यात आले आहेत. यापूर्वी 22 वर्षांपर्यंत दिव्यांग मुलांसाठी सीसीएल घेता येत होती मात्र आता सरकारने अशा मुलांच्या पालकांसाठी दिव्यांग मुलाच्या वयाची अट हटवली आहे. हा मोठा दिलासा आहे.
तसेच सीसीएल लिव्ह घेणार्यांना आता वरिष्ठांकडून त्याच्या मंजुरीसाठी प्रतिक्षा घेण्याची गरज नाही. तसेच सीसीएल घेतली असेल तरीही त्या काळात एलटीसी घेण्यासाठी देखील कर्मचारी मोकळे असतील.