CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेच्या निकालात एकूण 88.39 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.41% ने वाढले आहे. तथापि, मुलींनी मुलांपेक्षा 5.94% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे असून 91% पेक्षा जास्त विद्यार्थीनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
CBSE 2025 Class 12 Results: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकाल जाहीर (CBSE 2025 Class 12 Results Declared) केला आहे. परीक्षेत बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. या परीक्षेच्या निकालात एकूण 88.39 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.41% ने वाढले आहे. तथापि, मुलींनी मुलांपेक्षा 5.94% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे असून 91% पेक्षा जास्त विद्यार्थीनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
उत्तीर्णतेची टक्केवारी 0.41 टक्क्यांनी वाढली
ही परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 ते 4 एप्रिल 2025 पर्यंत चालली. या वर्षी निकालात मागील वर्षीच्या तुलनेत सुधारणा दिसून आली आहे आणि जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण 17,04,367 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १६,९२,७९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. यापैकी 16,92,794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यामुळे एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 88.39% झाली. तर, गेल्या वर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण 87.98% होते. अशाप्रकारे, यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत 0.41% वाढ झाली आहे. (हेही वाचा - Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची)
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर -
प्रादेशिक निकालांमध्ये विजयवाडा आघाडीवर -
दरम्यान, विजयवाडा 99.60% उत्तीर्णतेसह आघाडीवर आहे. यानंतर, त्रिवेंद्रममध्ये 99.32% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि चेन्नईमध्ये 98.47% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिल्लीच्या दोन्ही प्रदेशांनी - दिल्ली पश्चिम (95.34%) आणि दिल्ली पूर्व (95.06%) - चांगली कामगिरी केली.