Foreign Funding Case: वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह,आनंद ग्रोवर यांच्या मुंबई, दिल्ली येथील घर, कार्यालयांवर सीबीआयचे छापे

Lawyers Indira Jaising | (Photo Credits: Twitter)

Foreign Funding Case:  सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह (Lawyers Indira Jaising) आणि त्यांचे पती आनंद ग्रोवर (Lawyers Anand Grover) यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआय (CBI) पधकाने गुरुवारी (11 जुलै 2019) सकाळी कारवाई करत छापे (CBI Raids) टाकले. 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या संस्थेच्या माध्यमातून या दाम्पत्याने परदेशी निधी नियामक कायदा (Foreign Funds Regulatory Act) उल्लंघन केल्याचा या दोघांवर आहोप आहे. या आरोपावरुनच हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. कारवाई अद्यापही सुरु असल्याचे समजते. दरम्यान, सीबीआय प्रवक्त्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त देताना म्हटले आहे की, हे छापे मुंबई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी टाकण्यात आले आहेत.

सीबीआयने इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर तसेच 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या एजीओच्या विरोधात परदेशी निधी नियामक कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार होती. सीबीआयने दोघांवर (इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर) परदेशातून आलेल्या निधीचा चुकीचा वापर केल्याचा आरोप ठेवला होता.

एएनआय ट्विट

हे प्रकरण बरेच जुने आहे. इंदिरा जयसिंह 2009 ते 2014 या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल होत्या. त्या काळात त्यांच्या विदेश दौऱ्यावर झालेला खर्च गृहमंत्रालयाची मान्यता न घेताच त्यांच्या 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला होता.

अरविंद केजरीवाल

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या या कारवाईवर टीका केली आहे. केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, ''सुप्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्यावर कारवाईकरत सीबीआयने टाकलेल्या छाप्याचा मी निशेध करतो आहे.. कायद्याने आपले काम करत राहिले पाहिजे. परंतु, जे दिग्गज आपली सर्व हायात कायद्याचे शासन आणि संवाधानिक मुल्ये कायम राखण्यासाठी संघर्ष करत आले आहेत. त्यांच्यावरील कारवाई म्हणजे ही सरळ सरळ बदल्याची भावना आहे.''