Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींवर CBI कडून चार्जशीट दाखल, 4 जानेवारीला होणार सुनावणी

शुक्रवारी सीबीआयच्या वतीने चार्जशीट दाखल करण्यात आली असून येत्या 4 जानेवारी 2021 ला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महिलांवरील होणारे अत्याचार कधी थांबणार याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण (Hathras Gang Rape Case) आजही आठवले तरी लोकांचा थरकाप होती. एका दलित तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावक-यांमुळे तो प्रयत्न फसला. मात्र उपचारादरम्यान त्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला. . याप्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता याप्रकरणी सीबीआयने (CBI) चार आरोपींना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. शुक्रवारी सीबीआयच्या वतीने चार्जशीट दाखल करण्यात आली असून येत्या 4 जानेवारी 2021 ला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

14 सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाताना तिच्यावर 4 जणांकडून बलात्कार करण्यात आला. यामध्ये तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न झाला. या झटापाटीमध्ये तिला जबर जखमा झाल्या. जीभेला, मानेजवळ, पाठीजवळ हाडांना दुखापत झाली. या आरोपींनी त्या तरुणीची जीभ देखील कापली होती. पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिच्यात काही सुधारणा न झाल्याने तिला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.हेदेखील वाचा- Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर

हाथरस जिल्ह्यामध्ये 19 वर्षीय बलात्कार करणार्‍यांमध्ये संदीप, लवकुश, रामू आणि रवि या 4 जणांचे नाव तिने घेतले आहे. दरम्यान तिला मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या वेळी तरूणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीभेला दुखापत झाली. मुलीच्या मदतीला ग्रामस्थ आल्यानंतर आरोपी फरार झाले मात्र पोलिसांनी थोड्या वेळातच चौघांना अटक केली होती.

उत्तर प्रदेशातील हाथरस गॅंगरेप प्रकरणानंतर देशभरातून राजकीय, बॉलिवूड जगतातील सेलिब्रिटींसोबतच सामान्यांनीदेखील आपला रोष व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. दरम्यान, समाजात महिलांवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. यातच हाथरस येथील घटनेने यात आणखी भर घातली आहे. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.