Caste Census Issue In Lok Sabha: जात जनगणना मुद्द्यावरुन अनुराग ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य; लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी आक्रमक भूमिकेत

भाजप खासदार आणि मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान (Parliament Debate) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर या मुद्द्यावरुन टीका करताना "ज्याची जात माहित नाही तो जनगणनेबद्दल बोलत आहे" असे वक्तव्य केले.

Rahul Gandhi vs Anurag Thakur | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जात जनगणना (Caste Census) मुद्द्यावरुन लोकसभेत (Lok Sabha) आज जोरदार गदारोळ झाला. भाजप खासदार आणि मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान (Parliament Debate) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर या मुद्द्यावरुन टीका करताना "ज्याची जात माहित नाही तो जनगणनेबद्दल बोलत आहे" असे वक्तव्य केले. ज्यामुळे विरोधी पक्षाकडून यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला. या वेळी सभागृहात जोरदार गदारोळ झाला. ठाकूर यांच्या वक्तव्यावर तितक्याच आक्रमकपणे उत्तर देताना राहुल गांधी यांनी 'तुम्हाला हव्या तेवढ्या शिव्या द्या.. पण जात जनगणना होणार. याच सभागृहात तुमच्या समोर ती मंजूर केली जाणार', असे ठासून सांगितले आणि थेट आव्हान दिले.

अनुराग ठाकूर यांचे स्पष्टीकरण

अनुराग ठाकूर सभागृहात बोलत असताना "ज्याची जात माहित नाही तो जनगणनेबद्दल बोलत आहे" असे वक्तव्य केले. त्याला विरोधक करत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान हस्तक्षेप केला. ते म्हणाले, "तुम्ही हवा तसा अपमान करू शकता, परंतु आम्ही जात जनगणना विधेयक संसदेत मंजूर करून घेऊ, हे तुम्ही विसरू नका." यावर ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले की, आपण आपल्या टिप्पणीत थेट कोणाचे नाव घेतले नाही. (हेही वाचा, Caste Census in Maharashtra: राज्यातील जातीय जनगणनेबाबत CM Eknath Shinde यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- 'समाजातील सर्व घटकांचे...')

सभागृहात गदारोळ

अनुराग ठाकूर भाषण करत असताना जगदंबिका पाल हे पिटासीन म्हणून लोकसभेचे कामकाज पाहात होते. सभागृहात सुरु असलेला गदारोळ कमी करण्याचा आणि सभागृह नियंत्रणात आण्याचा पाल यांनी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, खासदार आक्रमकच राहिले आणि त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. (हेही वाचा, Rahul Gandhi On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आधुनिक काळातील चक्रव्यूहात अडकला; संसदेत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा)

राहुल गांधी यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

सभागृहात गदारोळ सुरु असतानाच राहुल गांधींनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली, "या देशात जो कोणी दीनदलितांसाठी बोलतो, त्यांच्यासाठी लढतो, त्यांना इतरांकडून शिव्या घ्याव्या लागतात. मी सर्व शिव्या आनंदाने घेईन... महाभारतातील अर्जुनप्रमाणे, मी फक्त माशचा डोळा पाहू शकतो. जाती जनगणना हा आमच्यासाठी माशाची डोळा आहे. आणि आम्ही ती करु'', असे गांधी म्हणाले. याच वेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, ठाकूर यांनी त्यांना शिवीगाळ केली. पण मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. त्यांच्या शिव्याशापाची मला गरज आहे. दरम्यान, अर्थसंकल्पावर बोलतानाही राहुल गांधी यांनी तडाखेबंद भाषण केले. ज्यामुळे सत्ताधारी काही प्रमाणावर बॅकफूटला गेले.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी विरोधी बाकावरुन सरकारला प्रश्न विचारला. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावरुन आक्रमक होत यादव म्हणाले तुम्ही एखाद्याला त्याची जात कशी विचारु शकता? तुम्ही कोणालाही त्यांची जात विचारु शकत नाही.