Covid-19 Cases in India: देशातील 'या' 6 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ अधिक; नियमांचे पालन करण्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आवाहन

महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये कोरोना प्रार्दुभावाचे प्रमाण अधिक आहे. मागील 24 तासांत 24 हजार हून अधिक नव्या कोविड-19 रुग्णांची भर पडली आहे.

Union Health Minister Dr Harsh Vardhan (Photo Credits: IANS)

देशात कोरोना बाधितांची संख्या पु्न्हा वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये कोरोना प्रार्दुभावाचे प्रमाण अधिक आहे. मागील 24 तासांत 24 हजार हून अधिक नव्या कोविड-19 (Covid-19) रुग्णांची भर पडली आहे. ही मागील 83 दिवसांमधील सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील सध्याची परिस्थिती पाहता केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसंच लसीकरण सुरु असले तरी निष्काळजीपणा करण्याची ही वेळ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, "भारताचा कोविड-19 मृत्यू दर सर्वात कमी आहे आणि लसीकरणही सुरु आहे. तरी देखील निष्काळजीपणा करण्याची ही वेळ नाही. लोकांच्या निष्काळजीपणामुळे 6 राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन मी करतो." (कोविड-19 लसीकरणासंदर्भात चुकीची माहिती पसवणारी mohfw.xyz ब्लॉक; Fake Website ला बळी न पडण्याचे आरोग्य मंत्रालयाचे आवाहन)

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी 15,817 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची इतकी मोठी भर पडली आहे. (Mumbai COVID-19 Vaccination: मुंबईतील खासगी केंद्रांवर 24x7 कोरोना लसीकरण होणार- BMC)

आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, सध्या भारतातील कोरोना बाधितांची संख्या 1,13,33,728 वर पोहचली असून 1,58,446 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात 2,02,022 सक्रीय रुग्ण असून 1,09,73,260 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2,82,18,457 लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.