Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू
त्यांचे वय 16 वर्षे होते. उर्वरित मृतांचे वय 25 ते 30 वयोगटातील आहे. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यात (Mandi District) कार दरीत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंडी जिल्ह्यातील चौरघाटी येथील वर्धन येथे हा दुर्दैवी अपघात (Accident) झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री लग्न समारंभ आटोपून परतत असताना कारमधील प्रवाशांवर काळाने घाळा केला. अपघाताबाबत अधिक माहिती देताना मंडीचे एसपी साक्षी वर्मा यांनी सांगितले की, पाच मृतांपैकी एक अल्पवयीन आहे. त्यांचे वय 16 वर्षे होते. उर्वरित मृतांचे वय 25 ते 30 वयोगटातील आहे. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बैतुल-परासिया मार्गावरील हनुमान डोलजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन दोन जण ठार झाले. या अपघातात 12 जण जखमी झाले. (हेही वाचा -Jammu and Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने अपघात; एक सैनिक ठार, 9 जण जखमी)
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) कमला जोशी यांनी सांगितले की, ट्रॅक्टर-ट्रॉलीमधील सर्व प्रवासी मजूर होते. ते बैतूल रेल्वे स्थानकावरून त्यांच्या गावी जात होते. वाहन पलटी झाले, परिणामी यात दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Pune Daund Accident VIDEO: क्षणात मृत्यू; पुणे येथील दौंड परिसरातील थरारक घटना CCTVत कैद)
अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व कामगार एक महिन्यापूर्वी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून बैतूल येथे आले होते. हे सर्व कामगार येथील एका कारखान्यात काम करत होते. तीन गंभीर जखमींपैकी एकाला भोपाळला रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, बैतूलमधील अन्य एका घटनेत ट्रकने दुचाकीला धडक दिली, परिणामी तीन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.