Kerala Newly Married Couple Accident: केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात कारची बसला धडक; नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मुवट्टुपुझा राज्य महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
Kerala Newly Married Couple Accident: केरळ (Kerala) मधील पथनमथिट्टा जिल्ह्यात (Pathanamthitta District) एक भीषण रस्ता अपघात (Accident) झाला. रविवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला कारची धडक (Car Hits Bus) बसली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मुवट्टुपुझा राज्य महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
स्थानिकांनी अपघातग्रस्त वाहनातून प्रवाशांना बाहेर काढले. पोलिसांनी सांगितले की, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. भरधाव कारने बसला धडक दिली. ही बस तेलंगणातून शबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जात होती. बसमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. (हेही वाचा -Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
घरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर झाला अपघात -
गेल्या महिन्यात लग्न झालेले नवविवाहित जोडपे मलेशियामध्ये हनिमून करून घरी परतत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडितांच्या घरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती)
प्राप्त माहितीनुसार, लग्नानंतर हे जोडपे हनिमूनसाठी मलेशियाला गेले. हनिमूनच्या गोड आठवणी घेऊन घरी परतल्यानंतर ते आपल्या प्रियजनांसह विमानतळावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. 30 नोव्हेंबरला दोघांचा विवाह झाला होता. त्यांच्या घरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. निखिलचे वडील मथाई इप्पेन आणि अनुचे वडील बिजू पी जॉर्ज यांचाही अपघातात मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेली मारुती स्विफ्ट कार आंध्र प्रदेशातील शबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला धडकली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.