दिल्ली हिंसाचार: 8 राऊंड फायरिंग करणारा तरूण 'शाहरूख' पोलिसांच्या अटकेत

तर त्यांच्यासोबतच 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर आज सरकारी आणि प्रायव्हेट शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाहरुख ( फोटो क्रेडिट- ANI )

दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)समर्थक आणि विरोधकांच्या आंदोलनाने पुन्हा हिंसक वळण मिळाले आहे. नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलना मध्ये एका पोलिस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबतच 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर आज सरकारी आणि प्रायव्हेट शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आजच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र भरदिवसा दिल्लीमध्ये आठ राऊंड गोळ्यांचे फायरिंग करणारा शाहरूख (Shahrukh) याला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. हा संशयित आरोपी दिल्ली शहराचा रहिवासी आहे. आज सकाळच्या सुमारास ब्रम्हापूरी आणि मौजपूर इथे दोन गटांमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. CAA Protest: दिल्लीतील गोकुलपुरी येथे गोळीबारात 1 हेड कॉन्स्टेबल ठार, डीसीपी जखमी; अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे मदतीची मागणी.  

मौजपूरमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यानचा आरोपी शाहरूखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने लाल रंगाचा टी शर्ट परिधान केला असून त्याच्या हातामध्ये बंदूक देखील होती. शाहरूखने 8 राऊंड फायरिंग केली आहे. या गोळीबारादरम्यान एका पोलिस जवानाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही शाहरूख बेधडपणे फायरिंग करत राहिला.

ANI Tweet  

उत्तर दिल्लीमधील हिंसाचारानंतर काल बंदोबस्तासाठी असलेल्या रतन लाल यांचा मृत्यू झाला असून डिसीपी अमित शर्मा यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहे. सध्या त्यांच्यावर पटपड़गंज मधील रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिल्लीमध्ये हिंसाचार नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आदेश दिले असून हिंसाचार पेटवणार्‍याविरूद्ध कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण तणावपूर्ण वातावरण लक्षात घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.