Buldhana Accident News: बुलढाण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह 3 ते 4 वाहनांना दिली धडक; 4 प्रवाशी जखमी

बुलढाण्यातील शेगाव येथे 2023 च्या शेवटच्या रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Buldhana Accident News: बुलढाण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह 3 ते 4 वाहनांना दिली धडक; 4 प्रवाशी जखमी
Thane Shocker: 'I want justice... !' Senior officer's son tries to kill girlfriend by running over SUV in Thane in Ghodbunder Area; The incident narrated by the victim on social media (See Post)

Buldhana Accident News: बुलढाण्यातील शेगाव येथे 2023 च्या शेवटच्या रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेला कारचालकने वेगात कार चालवली आणि दुचाकीसह 3 ते 4 वाहनांना जोरदाक धडक दिली. या  धडकेत भीषण अपघात झाला. अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 31 डिसेंबर रोजी शेगाव- बाळापूर मार्गावर काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. कार भरधाव वेगात होती. दरम्यान चालकाचे कार वरिल नियत्रंण सुटल्याने  3 ते 4 वाहनांना धडक दिली. त्यात दुचाकीचाही समावेश आहे. शेगाव बाळापूर मार्गावर जात असताना चालकाचे कारवरिल नियत्रंण सुटलं आणि समोरून जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. भीषण अपघातात कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे ४ प्रवाशी जखमी झाले.

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी झालेल्या लोकांना तात्काळ शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2024 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).