बुलंदशहर हिंसाचार (फाईल फोटो )

Bulandshahr Violence:  उत्तरप्रदेशातील बुलंदशहर (Bulandshahr) येथे गोहत्येच्या संशयावरुन उसळलेल्या हिंसाचाराने (violence) इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांचा बळी घेतला. या प्रकरणी लष्काराचा जवान जितेंद्र मलिक उर्फ जीतू फौजी याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. जीतू फौजी याला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली. बुलंदशहर हिंसाचारातील 27 आरोपींमध्ये जीतूचे ही नाव होते. सुबोध सिंग यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप जीतू फौजीवर होत आहे. पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी एडीजी प्रशांत किशोर यांचा खुलासा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळीच जीतू फौजी याला ताब्यात घेतलं होतं. रात्री उशिरा जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये त्याला अटक करुन मेरठ येथे आणण्यात आलं. जीतू हा जम्मू काश्मीर येथील 22 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होता. बजरंग दल, विहिंप, भाजयुमो कार्यकर्त्यांसह 87 जणांवर FIR

बुलंदशहर हिंसाचारामध्ये जीतूचा कोणत्याही प्रकारचा हात नसल्याचे त्याचा भाऊ धमेंद्र मलिक याने यापूर्वीच सांगितले होते. तो पूर्णपणे निर्दोष असून त्याने सुबोध सिंग यांची हत्या केली नसल्याचे त्याने म्हटले आहे. हत्या झाली त्यावेळेस जीतू फौजी तिथे उपस्थित नसल्याचे माझ्याकडे पूरावे आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात योगी आदित्यनाथ यांची मदत घेणार असल्याचेही त्याने म्हटले होते.

बुलंदशहर जिल्ह्यातील सियाना येथे गोहत्येचे अवशेष सापडले होते. त्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत घटनेचा निषेध केला. तसेच जाळपोळ करण्यात आली. त्यावेळेस जमावाला आवर घालण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला. त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यात सुबोध कुमार सिंग यांचा मृत्यू झाला.