Bulandshahr violence: अखलाक हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सुबोध सिंग यांची जमावाकडून हत्या
जिल्ह्याचे मुख्य शहर आणि पोलीस स्टेशन यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यापासूनह हे ठिकाण सुमारे 30 किलोमीटर दूर आहे.
Bulandshahr violence: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर ( Bulandshahr) जिल्ह्यातील कथीत गोहत्येनंतर उसळलेल्या हिंसाचाराने (violence) देशभरात खळबळ माजवली आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, बुलंदशहच्या सियाना शहरात चिंग्रावती पोलिस स्टेशनपासून केवळ 500 मीटर अंतरावर एक टाटा सूमो, काचांचे तुकडे आणि छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले हेल्मेट दिसत आहे. जिल्ह्याचे मुख्य शहर आणि पोलीस स्टेशन यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यापासूनह हे ठिकाण सुमारे 30 किलोमीटर दूर आहे. महुआ आणि चिंग्रावती ही गावे या घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावरच आहेत. जिथे पोलीस स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO)सुबोध कुमार (Subodh Kumar Singh)यांची जमावाने सोमवारी हत्या केली. दरम्यान, दादरी येथे झालेल्या अखलाक हत्या प्रकरणाचा तपासही सुबोध कुमार यांनीच केला होता.
काय आहे प्रकरण?
महुआ आणि चिंग्रावती गावातील नागरिक सियाना पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी शेतात मृत गायीचे शव पडले असल्याचे सांगितले. सुमारे ५० ते ६० लोकांच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या जमावाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ट्रॉलीमध्ये आणलेले ते शव चिंग्रावती पोलीस स्टेशनबाहेर ठेवत बुलंदशहरकडे जाणारा रस्तेमार्ग बांद केला. या वेळी सियाना पोलीस स्टेशन प्रमुख सुबोध कुमार सिंह सकाळी दहा ते ११ च्या सुमारास घटनास्थळावर पोहोचले. या वेळी सुबोध कुमार यांच्यासोबत केवळ तीन पोलीस कर्मचारी होती. ज्यात गाडीचालकाचाही समावेश आहे.
दरम्यान, घटनास्थळावर पोहोचलेल्या एसएचओ सुबोध कुमार यांनी जमावाला रस्त्यावरुन बाजूला होत वाहतूक पूर्ववत करण्यास सांगितले. तसेच, या प्रकरणात गुन्हा दाखल करुन शक्य तितक्या लवकर कारवाई करण्याचेही अश्वासन दिले. दरम्यान, जमावासोबत चर्चा सुरु असताना अचानक पणे जमावाने उग्र रुप केले. सुबोधकुमार यांना जमावाने घेरले. सुबोधकुमार यांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण, जमाव बेकाबू होत असल्यामुळे सुबोधकुमार यांनी तेथून परतण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, 2019 मध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान लग्नांवर बंदी; योगी सरकारचा आदेश)
प्राथमिक तपासाचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी असेही म्हटले आहे की, पोलिसांनी जमावापासून वाचण्यासाठी गाडी शेतात वळवली. सुबोधकुमार गाडीत होते आणि जखमी आवस्थेत होते. पुढे समोर आले की, सुबोध कुमार यांना झालेली जखम गोळी लागल्यामुळे झाली होती. या वेळी झालेल्या दगडफेकीत आणखी एक कर्मचारी जखमी झाला होता. गाडीचालक राम आसरे यांनी सांगितले की, जीव वाचविण्यासाठी आम्हाला तेथून निघावे लागले. कारण दगडफेक करणारा जमाव आमच्या पाठी येत होता. आम्ही सुबोध सरांचा मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण, जमावाचे आक्रमक रुप पाहून आम्ही निर्णय बदलला. दरम्यान, पोलीसबळ कमी पडल्यानेच सुबोधकुमार यांची हत्या झाली या अरोपाचे पोलीस विभागाने खंडण केले आहे.