Budget 2023 Live Streaming: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण, येथे पाहा लाईव्ह
देशभरातून उत्सुकता आहे की, यांदाच्या अर्थसंकल्पात काय मिळणार? सन 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा पूर्णवेळ असलेला शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करत आहेत आणि तो या कालावधीतील सरकारचा पाचवा अर्थसंकल्प आहे. सांसद लोकसभा टीव्ही, सांसद राज्यसभा टीव्ही, डीडी न्यूज आणि इतर अनेक वृत्तवाहिन्या सीतारामन यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करतील.
Union Budget 2023 Live Streaming: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी, 2023) केंद्रीय अर्थसंकल्प 2023/2024 (Union Budget 2023-24) संसदेत सादर करणार आहेत. 31 जानेवारी 2023 पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यानंतर देशभरातून उत्सुकता आहे की, यांदाच्या अर्थसंकल्पात काय मिळणार? सन 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा पूर्णवेळ असलेला शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करत आहेत आणि तो या कालावधीतील सरकारचा पाचवा अर्थसंकल्प आहे.
सांसद लोकसभा टीव्ही, सांसद राज्यसभा टीव्ही, डीडी न्यूज आणि इतर अनेक वृत्तवाहिन्या सीतारामन यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करतील. अर्थसंकल्पाचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.
व्हिडिओ
कोरोनानंतर जगासमोर उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे जागतिक मंदीची चिन्हे दिसत आहेत. परिणामी अनेक मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक मंदीच्या तोंडावर भारताचा अर्थसंकल्प 2023 आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याची योजना कशी आखत आहे यावर देशाची भविष्यातील लय निश्चित होणार आहे. पगारदार वर्ग किंवा आम जनता (सामान्य माणूस) यांना आशा आहे की केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मुळे त्यांचे कर दायित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा निर्मला सीतारामन यांच्यावर खिळल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री आज सकाळी 11 वाजता - मोदी सरकारमधील त्यांचे पाचवे आणि शेवटचे अर्थसंकल्पीय भाषण सादर करतील.
व्हिडिओ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संसतेतील अर्थसंकल्पीय भाषण थेट पाहण्यासाठी आपण संसदेचे अधिकृत चॅनेल पाहू शकता. आपण संसदेच्या यूट्यूब चॅनलवरही अर्थमंत्र्यांचे भाषण पाहू शकता. याशिवाय सीतारामन यांचे भाषण आपण abp वर देखील पाहू शकाल.