Revised Income Tax Slabs: Income Tax Exemption Limit ते 87A अंतर्गत New Tax Regime मध्ये पहा काय झाले बदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला आहे.

Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

नोकरदारांचं लक्ष लागलेल्या टॅक्स (Tax) निगडीत घोषणेबाबत सकारात्मक बाब आजच्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramala Sitaraman) यांनी टॅक्स स्लॅबमध्ये सूट दिली आहे. तर 7 लाख पर्यंतच्या कमाईवर टॅक्स द्यावा लागणार नाही. पूर्वी ही 5 लाख होती ती आता 7 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान यामुळे समाजातील मोठ्या वर्गाला फायदा मिळणार आहे.तसेच ही कर सवलत केवळ नव्या टॅक्स रिजीम साठी असेल अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी नवी टॅक्स रीजीमच आता पूर्ण वेळ नवी टॅक्स रीजीम करण्याचा मानस  असल्याचं व्यक्त करण्यात आलं आहे.

निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर प्रणाली अंतर्गत आयकर सूट मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये section 87A of new income regime अंतर्गत सवलत 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी, नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलत मर्यादा 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली होती. जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलत मर्यादा, सवलत आणि कर स्लॅबमध्ये कोणतेही बदल  केलेले नाहीत.

दरम्यान आता जर तुम्ही नव्या  टॅक्स रिजीम स्वीकारणार असाल तर  मध्ये 3 लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांना 0% टॅक्स भरावा लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा 2.50 इतकी होती. तर 3-6 लाखासाठी 5%, 6-9 लाख उत्पन्न असणार्‍यांना 10% टॅक्स द्यावा लागणार आहे.

 

 

दरम्यान Senior Citizen Account Scheme योजनाची मर्यादा आता 9  लाख इतकी करण्यात आली आहे. आता जेष्ठ नागरिक या योजनेत  4.5 ऐवजी 9 लाख रुपये जमा करू शकतील तर संयुक्त खात्याची मर्यादा 15 लाख इतकी करण्यात आली आहे.