Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांचं हित हे अजूनही दूरचं स्वप्न म्हणत केलं 'हे' ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून बजेटवर टिपण्णी केली आहे.शेतकऱ्यांसाठी योजना जरी घोषित केल्या असल्या तरीही शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचे काम हे अजूनही दूर भासणारे स्वप्नच आहे असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

Sharad Pawar And Nirmala Sitharaman (Photo Credits: PTI)

नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा अर्थसंकल्प (Budget 2020)  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत मांडला. शेतकरी वर्गासाठी 16 कार्यक्रमांची योजना, नोकरदार वर्गासाठी कर संरचना आणि इनकम टॅक्स मधील अनेक तरतुदी असलेल्या या अर्थसंकल्पावर अनेक राजकीय मंडळींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून बजेटवर टिपण्णी केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी योजना जरी घोषित केल्या असल्या तरीही शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचे काम हे अजूनही दूर भासणारे स्वप्नच आहे असे शरद पवार यांनी म्हंटले आहे. तसेच बजेट मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे योग्यप्रकारे लक्ष दिलं गेलेलं नाही. असेही ते म्हणाले आहेत. (Union Budget 2020 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण कडून अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या अशा गोष्टी ज्यांचा तुमच्यावर होणार परिणाम)

आज अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी तब्बल 2 तास 41 मिनिटे लांब भाषण केले यावरही अनेकांनी प्रतिक्रिया देत खासदारांना एकवेळ कंटाळा येईल इतके भाषण झाले असे म्हंटले होते. शरद पवार यांनी याविषयी बोलताना हे सर्वात लांब भाषण होते परंतु त्यामध्ये दूरदृष्टी आणि दिशांचा अभाव होता अशी टिपण्णी केली आहे.

शरद पवार ट्विट

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा बजेट सादर झाल्यानंतर "निर्मला सीतारमण यांनी अडीच तासांच्या वर त्यांनी संसदेत भाषण केल आहे. हे बजेट निराशाजनक असून त्यांनी अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद केलेली नाही. मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा आहे. तसेच मोदी सरकारने कररचनेला अधिक क्लिष्ट केले" असल्याचे म्हंटले होते.